नांदेड| प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड आणि तिरुपती दरम्यान चार साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहेत, ते पुढील प्रमाणे ---
अनु क्र. | गाडी क्र | कुठून – कुठे | प्रस्थान | आगमन | दिनांक |
1
| 07641 |
नांदेड – तिरुपती (सोमवार) | 22.45 | 22.10 (दुसऱ्या दिवशी )
| 1 आणि 08 ऑगस्ट, 2022 |
2 | 07642 | तिरुपती-नांदेड- (मंगळवार) | 23.50 |
23.45 (दुसऱ्या दिवशी) | 2 & 09 ऑगस्ट, 2022 |
1) गाडी क्रमांक 07641 / 07642 नांदेड-तिरुपती-नांदेड स्पेशल: (04-सेवा)
या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, काचेगुडा, उमदानगर, शादनगर, महबूबनगर, गडवाल, कुर्नूल सिटी, ढोणे, गुत्ती ताडीपत्री, येरागुंटला, कडप्पा, रझामपेट आणि रेनिगुंटा स्टेशन दोन्ही दिशांना येथे थांबतील. या विशेष गाड्यांमध्ये ए.सी. 2 टियर, ए.सी. 3 टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
नांदेड – संत्रागच्ची -नांदेड एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द
नांदेड| नागपूर विभागातील ट्राफिक ब्लॉक मुळे नांदेड - संत्रागच्ची -नांदेड एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे– १) दिनांक 01 ऑगस्ट 2022 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 हुजूर साहिब नांदेड – संत्रागच्ची एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २) दिनांक 03 ऑगस्ट 2022 ला संत्रागच्ची येथून सुटणारी गाडी संख्या 12768 संत्रागच्ची - हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.