किनवट, माधव सूर्यवंशी| "मरावे पण किर्ती रुपी उरावे 'दिवंगत स्व.प्रा.किशनराव किनवटकर सर यांनी आपल्या जीवनात अनेक क्षैत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी,सामाजिक, राजकीय क्षेत्रात सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन,जवळ घेऊन विकासात्मक राजकारण आणि समाजकारण करुन एक आदर्श समाजापुढे उभे केले.
असे मत योगगुरू अखिलखान यांनी व्यक्त केले आहे. ते रविवार दि.३१जुलै रोजी प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शहरातील मनसब योग साधना केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व पक्षीय लोकांची उपस्थिती होती.माजी नगराध्यक्ष के.मुतीं , भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, साईबाबा मंदिर चे पवार गुरू स्वामी, पत्रकार किशन भोयर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण तिरमणवार,प्रा.सरपाते, भालेराव सर,संजीव बॅनर्जी,केतन किनवटकर , सुनिल खामकर, पुष्कर शर्मा,श्रीनीवास गुंजकर इ.उपस्थित होते.