नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये २८ ते ३०जुलै, असे तीन दिवसीय ‘गणितीय विज्ञान’विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. आजच्या शेवटच्या दिवशी या परिषदेच्या सांगता कार्यक्रमांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, हैद्राबाद येथील बिट्स पिलानीचे डॉ.पी. के. साहू, ब्राझील येथील डॉ.जो. राफेल आणि आयटीआय मुंबई, येथील डॉ. एस. आर.घोरपडे यांची उपस्थिती होती.
दि.२९ जुलै रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी ‘ट्रान्सफार्म फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि सिग्नल प्रोसेसिंग व ट्रान्सफॉर्मेशन करियर ट्रांसफार्म व त्यामधील मूलभूत संकल्पना आणि त्यांचा विविध क्षेत्रातील होत असलेल्या मुक्तहस्ते वापर आणि सिग्नल मॉडेलिंग या संकल्पनेवर आपले विचार मांडले. शेवटी त्यांनी सिग्नल प्रोसेसिंग आपल्या दैनंदिन जीवनात कशी उपयोगी पडते आणि त्याचे महत्त्व विशद केले.
ब्राझील येथील फिजीका युनिव्हर्सिटी मधील डॉ. जो. राफेल यांनी ‘कॉस्मो, अॅस्ट्रो आणि बिंगो टेलिस्कोप’ या विषयावर अत्यंत मुद्देसूद व्याख्यान दिले. त्यांनी आपले मत मांडताना डार्क एनर्जी,बिन्गो प्रकल्प आणि त्यामागील विज्ञानेव आव्हाने याचा वेधघेतला. त्याचबरोबर त्यांनी रेडीओ टेलिस्कोप, बिन्गोचे आंतरराष्ट्रीय प्रकल्पामधील वापर अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
३० जुलै रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये आयटीआय मुंबई, येथील डॉ. सुधीर घोरपडे यांनी फायनाईट फिल्ड विषयावर व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी परिमेयांची सुधारित संकल्पना मांडली. त्यानंतर हैदराबाद बीटस पिलांनी, येथील डॉ. पि.के साहू यांनी डार्क एनर्जी व गणितीय सूत्राद्वारे कसे ऑप्टीमायग्नेशन करता येईल, यावर विस्तृतपणे विचार मांडले.
दुपारच्या सत्रामध्ये हैदराबाद येथील सेन्ट्रल विद्यापीठाचे डॉ. सचिन भालेकर यांनी कॅल्क्युलस विषयातील मूलभूत संकल्पना मांडल्या. नागपूर येथील डॉ. गणेश केदार यांनी रिलेटिव्हिटी मधील आपले मत व्यक्त केले. या सत्रातील ऑनलाइन मोडद्वारे डॉ. फारूक रहेमान यांनी आकाशगंगेतील हॅलो रिजन मधील डार्क एनर्जीवर गणितीय सूत्राचा उपयोग यावरून भविष्याचा वेध कसा घेता येईल यावर आपले संशोधन मांडले. दुपारच्या सत्रामध्ये पुणे विभागाचे सहसंचालक डॉ.किरणकुमार बोंदर यांनी समारोपर व्याख्यान दिले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शितलकौर दरोगा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रूपाली जैन यांनी केले. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. अनिकेत मुळे, डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. उषा सांगळे, डॉ. रूपाली जैन, डॉ. उदय दिव्यवीर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.