नांदेड़। जिल्ह्यात मागच्या काही दिवसात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अगोदरच अतिवृष्टिने शेतकरी हवालदिल झाली आहे. पुन्हा भयंकर पावसाने कहर केला असून शिल्लक राहिलेली पीके भुईसपाट झाली आहे .किनवट आणि माहुर तालुक्यातील अनेक शेतकर्याचे नगदी पिक म्हणून गनल्या जाणाऱ्या कापूस ,सोयाबीनची हजारो हेक्टरावरील पीके पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे.
अतिवृष्टिमुळे खरीप पिकाचे १००%नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकरयाना नुकसानी सर्वे करून तत्काळ भरिव आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाकड़े कांग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक तथा गुजरात राज्याचे प्रभारी प्रमिल नाईक यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.