सरपंच उपसरपंच नागरिकांनी दिले पोलीस निरीक्षक भुसनर यांना निवेदन
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेंभी हे गाव आदर्श म्हणून जिल्हाभरात ओळखल्या जाते. परंतु या गावामध्ये काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आला आहे. या गावांत खुलेआम अवैध दारू विक्री यासह अन्य धंदे राजरोसपणे चालविले जात आहेत. याबाबत वारंवार अर्ज विनंती करून व तोंडी सांगून काही फरक पडला नसल्याचे आज गावकऱ्यांनी निवेदन देऊन याकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
अश्या प्रकारे चालविल्या जाणाऱ्या अवैध दारु विक्रीमूळ अनेकांना संसार देशोधडीला लागत आहेत. अगोदर अतिवृष्टीच्या कचाट्यात बळीराजा अडकला असताना या धंद्याने यावर विरझन टाकले आहे. काही दिवसांवर नागपंचमीचा सण आलेला असल्याने त्या सणांचे औचित्य साधून गावात जोमाने दारू विक्री व गंजीपत्त्याचे डाव मोठ्या प्रमाणात चालतात व यामध्ये वाद -विवाद होऊन गुन्हापर्यंत मजल जाऊन जातीवाचक शिवीगाळ करेपर्यंत घटना घडतात.
असे गुन्हे मागील काळात घडलेले आहेत. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी याकडे पोलिसांचे निरीक्षक साहेबांनी याविषयीची गंभीर दखल घेऊन अवैधरित्या विक्री होत असलेली दारू व नागपंचमीच्या सणावर गावात चालणारे गंजीपत्त्यांचे डावं पूर्णपणे बंद करावेत. जर पोलिस प्रशासनाने याची दखल न घेतल्यास यामुळे काहि विपरीत घटना घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार पोलिस प्रशासनच राहील असे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनावर सरपंच ग्रामपंचायत सदस्य व जागरूक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.