नांदेड| मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा व्यक्तींनी आपल्या योग्य माहितीसह प्रस्ताव विहित कालावधीत सादर करावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे आणि राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती प्रमुख तथा येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांतील महिला व पुरुष यांना एकूण दहा पुरस्कार दिले जातात.सन २०२२-२३ या वर्षाकरिता इच्छुकांनी आपल्या नाव, फोटो, पत्यासह आवश्यक माहितीचा बायोडाटा असलेला प्रस्ताव नागोराव डोंगरे, आशिर्वाद निवास, यशवंत काॅलनी, उमरी ता. उमरी जि. नांदेड -४३१८०७ या पत्यावर ३१आॅगस्ट २०२२ पर्यंत पाठवावेत. साहित्यिकांनी आपली २०२१-२२ या वर्षातील प्रकाशित साहित्यकृती दोन प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२१७६९८४१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.