वाळकी फाटा ते दगडवाडी रस्त्याची दुरवस्था -NNL


हदगाव।
हदगाव व हिमायतनगर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तालुक्यातील वाळकी फाटा ते दगडवाडी हा तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी दगडवाडी येथील नागरिक करीत आहेत.

हदगाव व हिमायतनगर या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते.  हिमायतनगर तालुक्यातुन हदगाव च्या औद्योगिक वसाहतीत अनेक तरुण कामासाठी येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हदगाव-तामसा महामार्गासाठी  KTIL कंपनीच्या गौण खनिज वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे हा रस्ता नादुरुस्त झाला आहे. 

रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांनाच्या अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपासुन शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने या रस्त्याने विद्यार्थ्यांचीही वर्दळ वाढली आहे. तसेच विविध शासकीय दाखले व अन्य कामांसाठी हदगाव ला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. 

हदगाव व हिमायतनगर तालुक्यांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याने नेहमीच 24 तास वाहनांची वर्दळ सुरुच असते. मात्र वाळकी फाटा ते दगडवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे लक्ष देवून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी दगडवाडी वाळकी धानोरा येथील नागरिकांनी केली आहे.

आजी माझी आमदाराच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची हीच अवस्था आहे तर इतर रस्त्याची काय अवस्था असेल  असा प्रश्न प्रवासी वर्गातून वर्तवली जात आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी