हदगाव। महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व कृषी विभाग पंचायत समिती हादगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन कृषी संजीवनी सप्ताह समारोह कार्यक्रम दिनांक १ जुलै २०२२ रोजी वेळ सकाळी ११ वाजता स्थळ पंचायत समिती हदगाव सभागृह येथे कृषी दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हदगाव तालुक्यातील काही कृषी सहाय्यकाची कृषी दिनाला दांडी मारल्याचे दिसून आले आहे.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्री ब्रिजेश पाटील तहसीलदार जीवराज डापकर कृषी विभागीय उपविभागीय अधिक कृषी अधिकारी श्री तपास कर गट विकास अधिकारी मयूर अंदेलवाड पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी आर डी रणवीर, कृषी अधिकारी श्री लहाने उपस्थित होते मात्र या कार्यक्रमाला अनेक कृषी सहाय्यक अनुपस्थित होते.
यावर कृषी सहाय्यक हा एक ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणारा कृषी विभागातील अनेक योजनांची माहिती देणारा हा एक महत्त्वाचा घटक असताना कृषी दिनाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी हजर असतात पण कृषी सहाय्यक हे अनुपस्थित राहतात यांचे मागचे कारण काय .? असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. या कृषी सहाय्यकावर कृषी विभाग कारवाई करेल का ..?

