लोहा| राज्यात सत्तांतर झाले आणि जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे "साई सुभाष " सत्ता केंद्र बनले. शिवसेना -भाजप सरकार आल्या नंतर लोहा शहरात शनिवारी पहिल्यांदाच जिल्ह्याचे खासदार आले त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रतापराव पाटील यांनी लोहा शहराच्या विकासासाठी आ राम पाटील रातोळीकर यांच्या कडून एक कोटी रुपयांचा विकास निधी नगर पालिकेसाठी मिळाला आहे असे जाहीर केले.
भाजपाच्या ताब्यात लोहा नगर पालिका आली आणि राज्यात सत्तांतर झाले त्यामुळे वचननाम्यात दिलेल्या आश्वासपूर्ती साठी अडचण आली पण राज्यात भाजपा-शिवसेना यांचे सरकार आले .सत्ताधारीआमदार याना पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला पक्षाचे आ.राम पाटील रातोळीकर यांच्या वतीने एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला असे खा प्रतापराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, बुद्ध विहार, शादिखाना, तसेच शहराच्या विकासासाठी जी आश्वासन दिले.
त्याच्या पूर्तीसाठी निधीची कमरता पडणार नाही आपले सरकार आले आहे असे प्रतापराव यांनी आश्वसित केले. यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी सभापती आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेते करीम शेख ,बालाजी खिल्लारे, भास्कर पाटील , नरेंद्र गायकवाड, शंकर पाटील ढगे, लक्ष्मण बोडके, बळी पाटील कदम, आपाराव पवार, जफ्रॉद्दीन बहोद्दीन, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.