हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरतील अनेक वर्षापासून हनुमान टेकडी नवी अबादी आली नगर व इदगाह परिसरातील नागरिक हे अनेक वर्षा पासुन या ठिकाणी राहतात व मतदान ही करतात. माञ त्यांच्या घराची नोदी न.पा. प्रशासनाने अध्याप घेतलेल्या नाही. त्या नोदी घेवुन त्यांना राज्य शासन व केद्रशासनाच्या घरकुलचा लाभ मिळवून दयावा अशी मागणी एम आय एमचे हदगाव तालुका अध्यक्ष अहेमद चाऊस यांनी एका निवेदन द्वरे जिल्हाअधिकारी यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले,आहे की शहरातील उपोरक्त भागात नागरिक अनेक दशकापासुन राहतात ते मतदान ही करतात माञ त्याच्या घराच्या नोदी न.पा. प्रशासनाने अध्याप ही घेतलेल्या नाही. परिणामस्वरुप त्यांना नागरीसुविधा तसेच शासनाच्या योजनेचा काहीच फायदा मिळत नाही. ह्या ञस्त नागरिकाच्या राहत असलेल्या घराची नोदी घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केलेली आहे.
माजी नगरसेवकाने सरकारी जमीन हडप केली
हदगाव शहरातील काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने आपल्या पदाचा गैरवापर करुन शहरातील गायरान जमीन ज्याचा सर्व्हे क्रमांक २२६ मधील जागा गैरमार्गाने विकत घेवून त्याने नगरपालिकेच्या मालमत्ता रजिस्टर मध्ये नोद करुन मालकी हक्क प्राप्त केला होता. हे प्रक्रण शिवसेनेचे माजी आ. नागेश पा आष्टीकर यांनी उचलला होता. नतर ह्या भुखंडाचे नेमके काय झाले या बाबतीत कारवाई का झाली नाही. असा प्रश्न ही अहेमद चाऊस यांनी दिलेल्या निवेदनात केला असुन, विशेष म्हणजे अनेक दशके वास्तव्य करणा-या गरीबा करिता शासनाच्या घरकुलच्या योजनेचा फायदा सर्वसामन्यांना मिळत नाही/ या बाबतीत न.पा. प्रशासन अन्याय भेदभावची भूमिका स्पष्ट जाणवत आसल्याचा आरोप ही निवेदनात करण्यात आलेला आहे.