नांदेड| जिल्ह्यात मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 708.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस झाला असून, यात किनवट आणि हिमायतनगर तालुक्यावर आभाळ फाटल्याची परिस्थिती नदी नालेओसांडुन वाहू लागल्यावर दिसते आहे.
जिल्ह्यात मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 1 (658.60) बिलोली-30.60 (762), मुखेड- 22.40 (660.60), कंधार-20.70 (682.30), लोहा-8.10 (635.70), हदगाव-6.20 (634.80), भोकर- 11.70 (804), देगलूर-15.30 (619.90), किनवट-42.30 (773.40), मुदखेड- 1.90 (852.80), हिमायतनगर-25 (929.10), माहूर- 37.30 (646.40), धर्माबाद-48.70 (794.10), उमरी- 17.80 (867.10), अर्धापूर- 00.50 (645.40), नायगाव- 14.50 (648.20) मिलीमीटर आहे.