अर्धापूर, निळकंठ मदने| जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान पिकांची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार नांदेड जिल्ह्यात असताना अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील शेतकरी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे.
अर्धापुर तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे आणि नदी काठावरील पिके खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . मध्यकाळात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दूबारा पेरणीचे संकट ओढले होते .त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तालुक्यात नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे केळी ,ऊस व हळद पिकांचेही नुकसान झालेले आहे .
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसगट नुकसान ग्राह धरून सोयाबीन हेक्टर पन्नास हजार रुपये व फळबाग हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.यावेळी चिटणीस अँड सचीन देशमुख,युवकचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे पाटील, शशी पाटील क्षीरसागर, शहराध्यक्ष शेख साबेर,धनंजय सुर्यवंशी,दत्ता पारवे ,एजाज मिर्झा,कल्याण मोळके ,मारोतराव भांगे ,अनिल मोळके ,आनंद साबळे ,अनिल साबळे ,आकाश देशमुख ,नंदकिशोर देशमुख ,प्रसाद साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते .