हदगाव, शे.चांदपाशा| शिवसेनेकडून आमदार म्हणून तीन वेळा एकवेळ खासदार म्हणून माञ काँग्रेस कडून 2019 च्या लोकसभाच्या निवडणूकीत माञ फार थोड्या मतानी हार खावी लागली होती. राज्यात शिवसेनेचे आमदार खासदार यांनी बंडखोरी करुन नवीन गट स्थापन केले. तर राज्यात शिदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे अश्या शिवसेनेच्या राजकीय दृष्ट्या कठीण परिस्थिती असुन, ही मातोश्रीच्या एका निरोपात हिगोली लोकसभाचे माजी खा.सुभाष वानखेडे यांनी सेनेचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर सह मुंबई गाठली.
शिवसेना प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बाधून सन्माने शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे माजी खा.वानखेडे सेनेतील काही संधीसाधु व चंडाळ चौकडीच्या मुळे ते कमालीचे वैतगाले होते. परिणाम स्वरूप त्यांनी शिवसेनेला आठ वर्षापुर्वी सोडचिट्टी दिली होती त्यांनंतर त्यांनी भाजपात गेले. तिथे त्यांचे मण रमले नाही नंतर काँग्रेसच्या बड्या नेत्याने त्यांना हेरल व काँग्रेस कडुन ते हिगोली लोकसभा निवडणूक लढवली माञ तिथे त्यांना काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे त्यांना परभावाचा फटका बसला.
नंतर काँग्रेस मध्ये ही आपल्या पेक्षा बाहेरचे नेतृत्व वरचढ होऊ नये म्हणून काँग्रेस स्थानिक नेतृत्ववाला वाटु लागल्याने त्यांना सार्वजनिक कार्यक्रमला पण टाळु लागले परिणाम स्वरुप त्यांनी पुन्हा शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला असता शिवसेनेतील छुपा शिंदे गट हा शिवसेना प्रमुख यांच्या पर्यत त्यांना जावूच देईना तरी ही तो अपमान त्यांनी सहन केला. तरी त्यांना कोणताही लाभाच पद नसतांना ही त्यांनी आपला सर्वसामन्यशी असलेल नात्यात त्यांनी कधीच खंड पडु दिला नाही. दररोज नागरिकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवतात हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
अन् मातोश्री वरुन बोलवण.... सोमवारी दि 19जुलै रोजी 5वाजे दरम्यान थेट मातोश्रीवरुन माजी खा. सुभाष वानखेडे यांना निरोप आला की, आपण मुंबईला या म्हणुन मोठ्या २० जुलै रोजी शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे याच्या हस्ते मातोश्री (मुबई) येथे सन्माने शिवबंधन बाधुन प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने माञ नादेड हिगोली जिल्हासह हदगांव विधानसभाक्षेञांत जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच कट्टर शिवसैनिकात माञ नवचैतन्य दिसुन येत आहे हे उल्लेखनीय आहे.