शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री कोरेवर कारवाई करा -प्रकाश मारावार -NNL


नांदेड|
अतिवृष्टीमुळे राज्य महामार्ग क्र. २६० कंदकुर्ती ते धर्माबाद येथील शंकरगंज भागात रखडलेल्या नाले बांधकामामुळे शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरल्यामूळे दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरचे कार्यकारी अभियंता श्री कोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य अभियंता श्री पांढरे यांच्याकडे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली.

राज्य महामार्ग क्र. 260 कंदकुर्ती. ते धर्माबाद या मार्गावरील धर्माबाद येथील शंकरगंज भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे रखलेल्या नाले बांधकामामुळे शेकडो लोकांच्या घरात पाणी जाऊन लाखोंचे नुकसान झाले. घरात शिरलेल्या पाणीग्रस्त नागरिकांना धर्माबाद येथील शिवसेना पदाधिकारी मदत करत होते. पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याचे काम धर्माबाद नगरपालिका व महसूल प्रशासनाचे होते. स्थानिक नगरपालिकेने सदरील प्रकरणी हात वरी केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तिव्र तणाव निर्माण झाला अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावून मदत करण्याचा प्रयत्न केला उलट मदत करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर संबंधित घटनेचा संदर्भ नसताना जाणून बुजून राजकोय दबावाला बळी पडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री कोरे च्या सांगण्यावरून अभियंता श्री हनुमंत नंरबाडे यांनी शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरे ब शहर प्रमुख अनिल कमलाकर इतर शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल करणारे सार्वजनिक बांधकाम

अभियंता श्री हनुमान नरवाडे व गुन्हे दाखल करंण्यास भाग पाडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रकाश मारावार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री पांढरे साहेब यांच्याकडे केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी