पाच तलवार,एक लोखंडी रॉड,मिरची पावडर पाकीट,एक दोरी पाच मोबाईल जप्त
किनवट, माधव सूर्यवंशी| रात्रीच्या गस्तीवर असलेल्या किनवट पोलिसांना गोकुंदा शहरातील ठाकरे चौकात एक टाटा सुमो वाहन संशयस्पद निदर्शनास आल्याने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले असता यातील एक आरोपी फरार तर पाच आरोपी मुद्देमालासह पोलिसांनी जेरबंद त्यांचे कडून देरोडा टाकण्यासाठी आणलेले पाच तलवार,एक लोखंडी रॉड,मिरची पावडर पाकीट,एक दोरी पाच मोबाईल असा एकूण 3 लक्ष 29हजार 100 रुपयाचा मुद्देमालासह आरोपी जेरबंद
याबाबत पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली अशी की दिनांक 29 जुलै च्या रात्री अकरा वाजून पाच मिनिटाला गोकुंदा शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात टाटा सुमो याचा क्रमांक MH34AA -9664हे वाहन संशयास्पद निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यास रोखून चौकशी केली असता त्यात मुख्यआरोपी विकास कुमार डिरीजन यादव वय 20 वर्ष राहणार सोमनाथ पूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर, प्रजल राजकुमार वनकर वय 23 वर्षे राहणार मुजली जिल्हा गडचिरोली, अविनाश शंकर कुशन पल्लीवर वय 22 वर्षे राहणार सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर, लवजोत सिंग हरदेव सिंग देवल वय 20 वर्षेराहणार सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर, संतोष भारत परसाके वय 22 वर्षेराजुरा जिल्हा चंद्रपूर अशा एकूण पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात एक लोखंडी रोड मिरची पावडर नायलॉन दोरी असे हत्यार साहित्य मिळून आले हे सर्व ठरावीक गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते .हे सर्व आरोपी किनवट शहर किंवा गोकुंदा शहरात दरोडा टाकण्याच्या हेतूने आले असावेत पोलिसांच्या सतरतेमुळे त्यांचा डाव फसला या दरम्यान या टोळीचा मुखिया मुख्य आरोपी आशिष एकनाथ जाधव राहणार सोमनाथपूर शाईनगर जिल्हा राजुरा हा पळून जाण्यास यशस्वी झाला.
हे दरोडेखोर चंद्रपूर जिल्ह्यातून किनवट येथे कोण्या मार्गे आले यादरम्यान त्यांनी कुठे घात केला का..? अशा अनेक गोष्टीचा उलघडा निष्पन्न होईल आज दुपारी किनवट न्यायालयात संबंधित पाच आरोपींना हजर केले असता दिनांक31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले .या मोहिमेत पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली स . पो . निरीक्षक गणेश पवार API वाठोरे, H C बोंडलेवाड पोहे का पांढरे ,गजानन डुकरे,परमेश्वर गाडेकर,एजाज पठाणआदींनी ही आजपर्यंतची धाडसी सर्वात मोठी कार्यवाही केली . उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स .पो. नि . गणेश पवार पुढील तपास करत आहे