मुख्यालयी न राहता शहरातून अधिकारी - शिक्षक कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच
उस्माननगर, माणिक भिसे| कंधार लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी हे शासनाने काढलेल्या आदेशाला न जुमानता व मुख्यालयाला राहण्याचा महा रोग झाला की काय ? अशी चिंता सर्वसामान्य जनतेला लागली आहे. पण याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी काळजीपूर्वक गांभीर्याने पाहत नसून अपडाऊन कर्मचारी याचीच मनमानी चालताना दिसून येत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक दुसऱ्याच्या पाल्यांची शैक्षणिक कारकीर्द दावणीला बांधून स्वतःच्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी जिल्ह्याच्या अथवा शहराच्या ठिकाणी राहून अंदाजे जवळपास 30 ते 40 किलोमीटर वरून आप डाउन करीत असल्याने उशिरा येणे व लवकर जाण्याची जणू काही स्पर्धाच शिक्षकांमध्ये लागलेली दिसून चित्र बस स्थानक व रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर सदरील ॲप डाऊन चा दुष्परिणाम होत आहे.
शासनाकडून मिळणाऱ्या पगाराच्या जोरावर जिल्हास्तरावरील खाजगी शिकवणीच्या पंचतारांकित जागांमध्ये आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक हे मुख्यालय न राहता शहरात वास्तव्यास राहून अपडाऊन करीत आहेत.ग्रामीण भागातील घरोघरी शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करीत आहे.
त्यामध्ये मध्येन भोजन प्रणाली, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तकासह अनेक योजना व विद्यार्थी यामध्ये समन्वय राखून योजना यशस्वीपणे राबवणे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा उंचावणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असते.त्यासाठी शिक्षकांना आपल्या वेळेचा त्याग करून सदरील योजना व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारणे गरजेचे असताना मात्र तालुक्यातील शिक्षक हे नांदेड व ग्रामीण भागातील गावे असा जवळपास 20 ते 30 किलोमीटर प्रवास करून दिवसासाठी दोन ते तीन तास वेळ प्रवासामध्ये वाया घालवीत आहेत. ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते म्हणतात आम्हाला अर्धा तास पुरे झाला.मी अर्ध्या तासात शाळेत पोहोचतो.; पण सन्माननीय गुरुजी जेव्हा तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस डोळ्यांची इजा होणार की नाही? आणि डोळे तपासून चष्मा घ्यावी लागणार हो की नाही,?
शासनाने आदेशात केलेल्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी आपले दैनंदिन वेळापत्रकानुसारच दैनंदिनी नियोजन करणे गरजेचे असताना मात्र ग्रामीण भागातील शिक्षक हे त्या उलट एसटी महामंडळाच्या किंवा आपल्या सहकार्याच्या शिक्षकांच्या गाडीच्या वेळापत्रकानुसारच आपले दैनंदिन नियोजन करीत असल्याचे पारदर्शक चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते.शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे शासनाने सक्त आदेश असताना शासनाचा आदेशाला पायदळी तुडवीत शाळा सुटल्यानंतर शिक्षकांचे एकामागे एक आपापल्या वाहनावर कोणी ॲटोने तर कोणी सहकार्याच्या गाडीवर निघून जातात.
सततच्या दैनंदिन प्रवासाने शिक्षकांचे शारीरिक व मानसिक थकवा आलेले शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवतील? बऱ्याच शिक्षकांची दररोज ये जा प्रवासाने मान पाठ यांना त्रास होताना दिसत आहे.शाळेच्या परिसरात तंबाखू सोडत उभे राहून गप्पा मारणे ,व्हाट्सअप वर सतत पहात बसणे; यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्पर्धा करू शकतात काय ?शिक्षक म्हणतात ,पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे , जर पालक मुलांना शिकवित बसला तर तुम्ही काय करणार ? शाळेच्या बेठक रुममध्ये विश्रांती करणार का ? पालक दिवसभर काम करणार की , मुलांना शिकवणार , तुमच्या शाळेत मुलांना पाठविले जाते ,शिक्षकांनी विद्यार्थ्यांनकडून अभ्यास करून घेतला पाहिजे ,त्याला अभ्यास दिला पाहिजे.या गोष्टी न करता मात्र अपडाऊन करीत नावाला शिक्षकी पेशा करणारे शिक्षक हे शासनाच्या वेतनाला चुना लावीत आहेत.असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे या अपडाऊन प्रकरणामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.