पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रा.वि.कॉ.ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांची मागणी, मंत्र्यांनी दिल्या ज़िल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचा सूचना
नांदेड। राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहर ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी माजी मंत्री जेष्ठ नेते कमलकिशोर कदम व रा.कॉं. शहर ज़िल्हाध्यक्ष डाँ.सुनील कदम यांच्या मार्गदर्शना खाली आज मुंबई येथे पर्यटन व क्रीडा ,युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन पर्यटनक्षेत्र श्री. गोपाळ चावडी मंदिर लिंबगाव हे पुरातन काळातील मंदिर असून अहिल्याबाई होळकर्णीने जिर्णोव्दार केलेला आहे .सदरील देवस्थान हे पर्यटनक्षेत्रा मध्ये येत असून महानुभाव पंथाचे खूप मोठे धार्मिक स्थळ आहे .
दरवर्षी येथे खूप मोठ्या संख्येने पालखी सोहळा तसेच यात्रा होत असते तसेच लग्न समारंभ विविध आनंद सोहळे येथे होत असतात त्यामुळे वर्षभरामध्ये लाखो भाविक भक्त येत असतात परंतु सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्या मुळे भक्तांनी गैरसोय होत आहे त्यामुळे कदम यांनी पर्यटन मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेत मंदिर परिसरातील सभामंड्प, फरशी तसेच विविध विकास कामा साठी अंदाजित 1.20 कोटी रुपय निधी देण्याची मागणी केली.
या मागणीच गांभीर्य लक्षात घेत पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांनी निधी देणाचे आश्वासन देत नांदेड ज़िल्हाधिकारी यांना पर्यटन विभागास विकास कामाचे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना केल्या अशी माहिती राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी दिली .