सकाळी जाग आली ती हैदराबाद येथील स्नेहलतादीदी जयस्वाल यांनी केलेल्या मोबाईलमुळे. दोन वर्षांपूर्वी आमच्यासोबत दीदींनी अमरनाथ यात्रा पूर्ण केली होती. दीदी ह्या नुकत्याच आजारातून ब-या होत होत्या. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांचा फोन आल्यामुळे मी काळजीतच फोन उचलला. त्यांनी सांगितलेल्या बातमीमुळे जीव भांड्यात पडला. आज त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सर्वांना त्यांच्यातर्फे अल्पोपहार देता येईल का अशी विचारणा केली. मी म्हटले, नेकी और पूछ पूछ... त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी रेल्वेतील पेंट्रीकार गाठले. डी आर यु सी मेंबर असल्याचे सांगून मॅनेजरला चांगला प्रतीचा नाश्ता बनवण्याची ऑर्डर दिली. साडेसातला आमचा सर्वांचा नाश्ता झाला. नाश्ता केल्यानंतर प्रवासातील मरगळ नाहीसी झाली. प्रत्येक जण उत्साहात दिसून येत होता.
एकमेकात सुरू असलेला संवाद आणि त्या संवादातून निर्माण होणारे ऋणानुबंध भविष्यकालीन आपुलकीच्या एकसंघाचे द्योतक म्हणावे लागेल. भरपूर वेळ असल्यामुळे कोण काय करतो कुठे राहतो याची चौकशी सुरू झाली. आमच्यासोबत प्राचार्य आत्माराम पळणीटकर,प्रा. नंदकुमार मेगदे, पत्रकार विनोद कापसीकर, बँक मॅनेजर सुधीर विष्णुपुरीकर, अरुणकुमार काबरा,सुभाष देवकते ,धोंडोपंत पोपशेटवार, घनश्याम शर्मा, पांडुरंग चंबलवार,दत्तात्रय कोळेकर, शिवाजीराव मोरे, ओमकार बंगरवार, सदाशिव देबडवार, रत्नाकर केसकर,सुभाष भाले ,विलास आराध्ये, गंगाधर नगनुरवार, हरिहर नारलावार,धोंडीबा भाडेकर, श्रीनिवास दायमा, सत्यनारायण बालमुकुंद दायमा, रामकिशन सोनटक्के, अशोक शेंद्रे , गोपाळराव सुरवसे,अशोक काप्रतवार,संजय बच्चूवार , एन. संदीप रेड्डी , ए.श्रीनिवास, सत्यनारायण गुलाबचंद दायमा,केशवराव महाजन हे सपत्नीक आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी दीपकसिंह गौर,प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा,कामाजी सरोदे,डाॅ.शुभम कोळेकर,गजानन पत्रे, विष्णू चव्हाण,किरण बेले, महेश शंखतीर्थकर,भाऊसाहेब कदम,श्रीपत माने,सुधाकर डांगे,बालाजी सोनटक्के,चिंतामण जाधव,संदीप कदम, प्रभाकर बेले ,अनंत काप्रतवार, के. आनंद, पी.अनिवेषबाबू ,के.शोभनराव, जी.चंद्रशेखर गौड ,एम.राजेंद्रराव , जे. व्यंकटरामाराव ही पुरुष मंडळी देखील दर्शनासाठी आली होती. भारती नेरलकर,संजीवनी रत्नाकर वाघमारे,
गीतादेवी राजपूत,अर्पिता आशिष नेरलकर ,मीनाक्षी पुजारी,बिना काकोडकर, प्रतिभा नेरलकर,प्रिया उन्हाळे, अनिता नेरलकर, सुलभा कापसीकर, शरयू नेरलकर , रूपाली देशमुख, अश्विनी भार्गव, शोभा जोशी, सुमित्रा टाकळीकर,आशालता स्वामी, उमा सोमवंशी, टी.लता या महिला देखील स्त्री शक्तीचा परिचय देत होत्या. श्रेणीका बच्चूवार ,अनुष्का राजपूत,श्रेयस बच्चूवार , ए. मनस्वीनी ही तरुणाई मोबाईल मध्ये गेम खेळण्यात व हेडफोन लावून गाणे ऐकण्यात दंग होती.
दुपारच्या सुमारास नवी दिल्ली स्टेशनवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने गरमागरम जेवण मिळाले. खासदार दिल्लीत नसताना देखील त्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली हे पाहून नांदेड बाहेरील यात्रेकरूंना आश्चर्य वाटले. मी त्यांना सांगितले की आमचे खासदार हे असेच सर्वसामान्यात मिसळत असतात .या जेवणाची सर्व महिलानीही खऱ्या अर्थाने कौतुक केले. हे जेवणाचे यश म्हणावे लागेल. त्यानंतर पुन्हा सुरू झाला प्रवास. प्रवासात जवळपास सर्व महिला एकत्र आल्या. त्यांनी भावगीत, विष्णुसहस्रनाम, वेगवेगळी भजने सादर करून पूर्ण वातावरण भक्तिमय केले. डब्यातील इतर भाषिक प्रवासी देखील आमची भजने ऐकून प्रभावित झाले असेच म्हणावे लागेल.
त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास लुधियाना रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी उतरले,यावेळी सरदार कुलदीपसिंग दीपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे जल्लोषात स्वागत केले. सिरोपाव आणि पुष्पहाराने स्वागत केल्यामुळे सर्वजण खुश झाले. सरदार कुलदीपसिंग दीपा व त्यांच्या सहकार्याच्या वतीने खीर, कुलचे, छोले आदींचे स्वादिष्ट भोजन आणले होते. वेगळ्या पंजाबी चवीच्या या भोजनामुळे सर्वजण तृप्त झाले. सर्वांचे जीवन संपल्यानंतर देखील बरेच अन्न शिल्लक होते. त्यामुळे आम्ही लंगर का प्रसाद लो भाई... लंगर का प्रसाद... असे सांगून स्टेशन वरील सर्वांना आग्रहाने वाढले. अन्न टाकून देण्यापेक्षा कोणाचे तरी पोटात गेलेले चांगले ही संतांची शिकवण आचरनात आणल्याचे समाधान वाटले. पुढची रेल्वे येण्यासाठी आणखी दोन तास शिल्लक असल्यामुळे परत एकदा गप्पांचा फड रंगला. साडेअकरा वाजता श्री शक्ती एक्सप्रेस लुधियाना स्टेशन वर आली. सर्वांचे तिकीट कन्फर्म असल्यामुळे निवांत होतो. सर्वजण व्यवस्थित बसल्याची खात्री केल्यानंतर रेल्वेमध्ये बर्थ वर बसून हा वृत्तांत देण्यास प्रारंभ केला. (क्रमशः)