हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील, सुविधा तात्काळ सुरु करा- दिनेश राठोड -NNL

समस्या सुटल्या नाहीतर रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध तक्रार देऊन कायदेशीर मार्गाने आंदोलन


हिमायतनगर|
येथील रेल्वे स्थानकावर कोरून याकाळात बंद झालेल्या सर्व सुविधा पूर्ववत करून प्रवाशी वर्गाना दिलासा द्यावा अशी मागणी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर बाबूराव समर्थक दिनेश राठोड यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून रेल्वे विभाग प्रशासकीय यंत्रणेला नम्र विनंती करून स्वचलित तिकीट वेटिंग मशीन सुरु करण्यासाठी साकडे घातले आहे. समस्या सुटल्या नाहीतर रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन तक्रार देऊन कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोना काळानंतर रेल्वे सुविधा पूर्ववत झाली असे असताना डॆहील हिमायतनगर रेल्वे स्थानकावर बहुतनष सुविधा उपलध नसल्याने सर्वमानया नागरिकांसह पहिला प्रवाश्याना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याचा अनुभव त्यांना नुकताच नांदेडला जात असताना आला असून, तिकिट काढण्यासाठी लाईनला उभा राहिलो असता तिकीट काढण्यासाठी जवळपास ३० मिनिटे लागली आहेत. खरे पाहता रेल्वे स्थानकावर उपलब्ध करण्यात आलेली स्वयंचलित टिकत यंत्रणा सुरु असायला पाहिजे होती. मात्र ती सुरु नसल्याने शेकडो जेष्ठ, महिला - पुरुष बांधवांसह शाळकरी बांधव, याना टिक्तिच्या लाईनमध्ये उभे राहावे लागत असल्याने प्रचंड गर्दी होते आहे.


त्यातच रेल्वे येणार असल्याचे समजल्यानंतर तिकीट विक्री चालू केली जात आहे. यामुले मोठी अडचण निर्माण होत असून, सगळ्या अडचणी तिकीट काऊंटर उशिरा चालू करत असल्यामुळे व स्वयंचलित तिकीट वेटिंग मशीन बंद असल्यामुळे होत असल्याचा आरोप दिनेश राठोड यांनी केला आहे. एव्हडेच नाहीतर येथील रेल्वे स्थानकावर लघुशंका गृह नसल्याने महिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या याठिकाणी असलेले प्रतिक्षालय नेहमी कुलूपबंद राहत असल्याने याचा फायदा कुनालयी होत नाही. लघुशंकागृह नसल्याने अनेक रेल्वे कंपाउंड भिंतीचा आसरा घेत आहेत, मात्र यातही महिलांची मोठी कुचंबणा होते आहे. 

हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक तेलंगणा - विदर्भाच्या सीमेलगत असल्याने या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची गर्दी होत असते, तसेच अनेक रुग्ण नागरिक काही न काही कारणाने तसेच तालुक्यातील असंख्य व्यापारी बांधव, नांदेड, औरंगबाद, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, पुणे आदींसह धार्मिक स्थळाला जाण्यासाठी येत असतात. मात्र येथे एकच तिकिट खिडकी  असल्याने मोठी गैरसोय होत आहे, एव्हडेच नाहीतर दूरच्या ठिकाणच एरिजर्वेशन करण्यासाठी मोठी अडचण, रात्रीच्या वेळेत स्टेशनवर लाईट चालू ठेवली जात नाही, त्यामुळे येथे चोर, लुटेरे यासह अवैद्य धंद्याचा वापर करणाऱ्यांचे  फावते आहे. रेल्वे स्टेशन वरील स्वच्छता, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था बरोबर नाही, या सर्व गैरसोयींमुळे नागरिक व प्रवाशी रेल्वे विभागाच्या कारभाराला वैतागली आहे. 

या सर्व बाबी आणि समस्या लक्षात घेता रेल्वेच्या विभागणीय व्यवस्थापकांनी तातडीने हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांसाठी तिकिटीखिडकी वाढवावी आणि स्वयंचलित तिकटी मशीन सुरु आकारून महिलां - पूरूषांसाठी लघुशंका गृह तात्काळ उभारून दिलासा द्यावा. ही समस्या लवकर न सुटल्यास संबंधित रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध तक्रार देऊन कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, आणि लवकरच हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील सर्व समस्यांची तक्रार  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे देणार असल्याची त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी