पंडित दीनदयाळ शिष्यवृत्ती योजनेची उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा - एसएफआय -NNL

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एसएफआय संघटनेचा भीक मागो आंदोलनाचा इशारा


नांदेड।
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् शिष्यवृत्ती योजनेची शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ वर्षाची उर्वरीत रक्कम तात्काळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी , अशी मागणी दि २९ जुन रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्या कडे एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेड च्या वतीने करण्यात आली.

कोरोना , ओमायक्राॅन महामारीमुळे राज्यातील काॅलेज, महाविद्यालय , विद्यापीठ ,वस्तीगृह बंद ठेऊन सरकाराने २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात काही दिवस ऑनलाइन शिक्षण दिले , पण नंतर आँफलाईन शिक्षण सुरू केले पण वेळवर वस्तीगृह सुरू झाले नसल्याने , विद्यार्थ्यांना शहरात  रूम किरायाने घ्यावे लागले तर स्वत:च्या खिशातून मेस चे व रूमच्या किरायाचे पैसे भरावे लागले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शहरात जाऊन उच्च शिक्षण घेणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांना सरकारकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. या शिष्यवृत्तीच्या भरोशावर हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतात. मात्र आत्तापर्यंत या शिष्यवृतीचा एकच हप्ता विद्यार्थ्यांना मिळाला.तर उर्वरीत शिष्यवृत्ती आजून जमा झाली नसल्याने विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शिक्षणासाठी घरून पैसे मिळत नाहीत व आदिवासी विभागाकडून शिष्यवृत्ती देखील वेळवर मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षण सोडून आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत.जर शिष्यवृत्ती साठी कुठल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिष्यवृत्ती विभागाची राहील असा गंभीर आरोप एसएफआय विद्यार्थी संघटनेचे काॅम्रेड पवन जगडमवार यांनी केले आहे. अनेकांचे आई वडिल व्याजाने व उसणे पासणे पैसे घेऊन मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवतात. शिष्यवृत्ती जमा झाली की ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना परत करातात.

मात्र शैक्षणिक वर्ष संपून देखील सदरिल शिष्यवृतीची संपुर्ण रक्कम अध्याप विद्यार्थांना मिळाली नसल्याने विद्यार्थी हतबल होऊन शिक्षण बंद करीत आहेत.त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृतीची उर्वरीत संपुर्ण रक्कम तात्काळ जमा करावी.अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतिने आदिवासी विद्यार्थ्यांना सोभत घेऊन दि ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा एसएफआय विद्यार्थी संघटनेचे काॅम्रेड पवन जगडमवार , शुभम देशमुख, मयुरी पाटील, प्रसाद पेंचलवार आदीने दिले आहे.

आदिवासी विभागाकडून शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी नेहमीच टाळाटाळा केली जात आहे, शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावे लागते. कित्येकदा मेसचे व रूमचे भाडे देण्यासाठी विद्यार्थ्यांन कडे पैसे नसल्याने घरमालकाचे व मेस वाल्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागते.अशा वेळी जर कुठल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण ? पैसे नसल्याने शिक्षण सोडून विद्यार्थ्यांना काम करावे लागते, शिष्यवृत्तीसाठी जर आत्महत्या करवी लागत असेल जर शिष्यवृत्ती वेळेवर मिळणार नसेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. बहीऱ्या प्रशासलनाला जर जाग येत नसेल तर आम्ही विद्यार्थी त्या प्रशासनाला जागे केल्याशिवाय शांत बसणार नाही. काॅम्रेड पवन जगडमवार, एसएफआय नांदेड

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी