अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 105 यात्रेकरूंचा पहिला जथ्था अमरनाथ यात्रेला जाणार -NNL


नांदेड|
अत्यंत कठिण समजली जाणारी व प्रत्येक हिंदु मनाला भावणारी अमरनाथ यात्रेला सतत एकोणिसाव्या वर्षी धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 105 यात्रेकरूंचा पहिला जथ्था शुक्रवार दि. 1 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता सचखंड एक्सप्रेसने रवाना होणार आहे.

तेरा दिवस चालणार्‍या यात्रेत दिल्ली, अमरनाथ, सोनमर्ग,गुलमर्ग, श्रीनगर,खिर भवानी माता, वैष्णोदेवी, जम्मू,अमृतसर, अटारी बॉर्डर या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करण्यात येणार आहे. अवघड यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी चार महिण्यापासून यात्रेकरुंनी दररोज सहा किमी चालण्याचा व प्राणायाम करण्याचा सराव केला आहे. पहिल्या जत्थ्यात ५७ पुरूष, ४८ महिलांचा समावेश आहे. नांदेड व्यक्तिरिक्त गोवा,हैदराबाद,पुणे ,ठाणे,अमरावती,नासिक, संभाजीनगर,परभणी,लातूर, हिंगोली ,जालना,आदिलाबाद, करिमनगर येथील यात्रेकरू सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंना प्रत्येकी एक वेळेसचे भोजन  खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, दीपकसिंह गौर संभाजीनगर, नवनाथ सोनवणे उदगीर, चंद्रकांत गंजेवार, नागेश  शेट्टी,हृदयनाथ सोनवणे, मनोज शर्मा नागपुर, प्रदीप शुक्ला भोपाळ, बापू कदम भुसावळ,कवि प्रताप फौजदार दिल्ली, सरदार सुदीपसिंघ अमृतसर, सुभाष बंग, ज्ञानोबा जोगदंड जम्मू यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.  

जगन्नाथ सोनवणे, कदम परिवार,डॉ. अजयसिंग ठाकूर पूर्णा, स्नेहलता जैस्वाल हैदराबाद,स्वाती कुलकर्णी, राजेश डुलगच संभाजीनगर हे अल्पोहार देणार आहेत. यात्रेकरूंसाठी डॉ. सुदर्शन, डॉ. संतोष मालपाणी,नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना, अमरनाथ यात्री संघ मुखेड यांनी मोफत औषधी दिल्या आहेत. यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी भाजप-सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरएसएस, विश्‍व हिंदू परिषद,बजरंग दल,एजांय स्विमींग ग्रुप, विसावा ग्रुप,नानक साई फाउंडेशन व इतर संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत. नांदेडकरांनी सकाळी नऊ वाजता रेल्वे स्थानकावर यावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी