समता विद्यालयचे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश -NNL

मागासवर्गीय मुलीत नंदनी सोनसळे प्रथम तर प्रणिता भिसे दुसरी


उस्माननगर, माणिक भिसे|
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून यश  संपादन केले असून सर्वप्रथम सुर्यवाड प्रणवी हि आली तर मागासवर्गीय मुलीत शाळेमधून नंदनी नालंद सोनसळे ही प्रथम तर दुसरा प्रणिता भिसे या विद्यार्थ्यांनीने अनुक्रमे येण्याचा मान मिळवून मुलीनी बाजी मारली आहे. संस्कृत विषयात उत्कृष्ठ गुण घेतल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

दि १७ रोजी दुपारी लातूर शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी परिक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल घोषित करण्यात आला.समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत नैत्रदीपक यशाला गवसणी घातली आहे. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात देशात कोरोना या रोगामुळे सर्वत्र बंदी घातली होती.परिक्षा सुध्दा घेण्याचे टाळले होते.कोरोनाच्या  परिस्थितीनंतर परिक्षा मंडळाने त्या त्या शाळेतच परिक्षा घेण्याचे जाहीर केल्या नंतर प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना अचूक असे ज्ञन देवून इतर शाळेपेक्षा आपल्या शाळेचा निकाल टक्केवारीत आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत ,या कसोटीत शिक्षकवृंद कामाला लागले होते.कोरोनामुळे उद्दभवलेल्ये अभूतपूर्व बिकट परिस्थिती नंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जात अवकाशाला गवसणी घातली आहे.

समता विद्यालयातील एकूण ९६.९६ टक्के निकाल लागला आहे.१०१ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.तीन विद्यार्थी व्दितीय श्रेणीत आहेत.शाळेचा निकाल ९६.९६ टक्के लागला असून शाळेतून सर्वप्रथम सुर्यवाड प्रणवी नारायण हिला ९३.०० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तर घोरबांड दिव्या गोविंदराव हिने ९२.२० टक्के गुण मिळवून व्दितीय आली आहे.वरताळे पल्लवी उमाकांत हीला ९०. २० टक्के तर सानिका रविराज लोखंडे हीला ९०. टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. 

सोनसळे नंदनी नालंद हीला ८९. टक्के ,माधव गोविंद ईसादकर याला ८९.८० टक्के ,सिफा आसिफ पठाण हीला ८९.३० टक्के गुण, मिळाले,प्रणिता राम भिसे हीला ८७.२०टक्के गुण घेऊन यशवंत होऊन शाळेचे नाव अवकाशात गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे संस्कृत विषयात मुलीनी मार्क सर्वधिक गुण मिळविले आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष पु.धो.देशपांडे , उपाध्यक्ष के.डी.देशपांडे , सचिव बा.दे.कुलकर्णी , सहसचिव तु.श.वारकड , कोषाध्यक्ष अनिरूद्ध सिरसाळकर, संचालक शा.शं.जहागिरदार , पत्रकार प्रदीप देशमुख, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड,पर्यवेक्षक राजीव अंबेकर, सोनवणे, ना.ना.लोंढे ,लामदाडे,नवसागरे, डांगे, पाटील, सौ.वर्षा देशमुख,सौ.गौतमी कुलकर्णी, इंगळे,यांच्यासह शिक्षकवृंद कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी