लोहा| कंधार -लोहा तालुक्यातीलमोठे राजकीय प्रस्थ अशी ओळख असलेल्या मुकदम परिवारातील प्रमुख माणिकराव व्यंकटराव मुकदम -चव्हाण हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. कारेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत त्याच्या पॅनेलच्या दणदणीत विजय झाला आणि ते स्वतः निवडून आले. त्यामुळे आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी त्यांचा प्रवेश सुकर झाला आहे.
कंधार पंचायत समिती व लोहा पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी सभापती म्हणून आपल्या ग्राम विकास कामांची दीर्घ कालीन प्रेरणा देणारे कै व्यंकटराव मुकदम-चव्हाण यांची जिल्ह्याच्या राजकारणात एक संयमी शांत राजकारणी म्हणून ओळख होती. सत्तर ऐंशी नव्वद च्या दशकात या भागात मराठवाड्याचे आधुनिक भागीरथ डॉ शंकरराव चव्हाण यांचे ते निष्ठावंत विश्वासू सहकारी होते.दीर्घकाळ त्यांचे कुटुंब काँग्रेस सोबत होते.
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे व मुकदम कुटुंबियांचे विश्वासाचे व आपुलकीचे नाते आहे.कारेगाव सेवा सहकारी सोसायटीत रेश्माजी दिघे- राम पाटील किरवले-माणिकराव मुकदम -दिलीप पाटील किरवले, दता पाटील, अरुण दिघे, शेषराव दिघे, मलकार्जुन देशमुख, राहूल हंकारे, केशव पवार , रावसाहेब पाटील व समर्थकांनी एकत्रित येऊन पॅनल उभे केले आणि १३ पैकी ११ जागा यांनी जिकल्या. वेगवगेळ्या पक्षांचे समर्थक या पॅनल मध्ये होते .सर्वांनी एकत्रित येऊन निवडूक लढविली व जिकले. प्रविण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर यान बंधूनी बिनविरोध झाली प्रयत्न केला होता.
निवडणुकीत युवा कार्यकर्ते सचिन मुकदम यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. नगर पालिका क्षेत्रांत अविश्वास ठराव व त्यानंतर उपनगराध्यक्ष निवडीसाठी बहुमत जुळवाजुळव सचिन मुकदम व सहकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर कारेगाव सेवा सोसायटीत मेहनत घेत विजय मिळविला. सरस्वती पत संस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण यांची जुळवाजुळव कामी आली.
माणिकराव मुकदम हे नेहमीच निवडूकीत किंगमेकार राहिले आहेत. कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्या त्यांनी खा प्रतापराव पाटील यांच्या सोबत पक्ष संघटनेत काम सुरू केले. सध्या ते भाजप राज्य कार्यकारणी सदस्य आहेत पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून आले. सहकार क्षेत्रात त्याचे या निमित्ताने पदार्पण झाले. त्यामुळे आगामी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या आमदार तसेच माजी आमदार व अन्य काही जणांनी खूप प्रयत्न केले पण मतदारांनी त्याना नाकारले व निवडून दिले. त्यांच्या विजया बद्दल मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.