लोहा तालुक्यात 'दहावीच्या निकालाची ऐतिहासिक नोंद 26 शाळांचा निकाल १०० टक्के -NNL

तालुक्यात केवळ ४५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत


लोहा|
बारा वर्षापूर्वी जेमतेम 25 टक्के इतका निकाल देणाऱ्या  व त्यातही शून्य टक्के निकालाची काही शाळांची नोंद होती तेथे यंदा लोहा तालुक्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या  निकालात ऐतिहासिक नोंद केली आहे. ५३ शाळां पैकी तब्बल २६ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. २२ शाळांचा निकाल ९० टक्क्यापेक्षा अधिक तर केवळ पाच शाळांचा निकाल ६६ ते ९० टक्के इतका आहे. संपूर्ण तालुक्याचा सरासरी निकाल ९६.४४ टक्के  लागला असून  पाच शाळांची  विद्यार्थी संख्या मात्र १० च्या आत एवढीच नोंदविली गेली हे विशेष. 

लोहा तालुक्यातील शालांत परीक्षेसाठी 5 3 शाळा मधुन 3 हजार १७३ विद्यार्थ्यापैकी ३ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९६.४४ टक्के इतका अगल आहे. १ हजार ७८० विद्यार्थ्यांना ७५ ते १०० टक्के इतके गुण आहेत, ८५९ विद्यार्थी प्रथम श्रेणी म्हणजे ६० ते ७५ टक्केच्या दरम्यान ३११ विद्यार्थी ४५ ते ६० टक्क्या दरम्यान तर केवळ ४५विद्यार्थि फक्त  पास  झाले आहेत.

लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयाची कु· कोमल सूर्यकांत कांजले (९८ टक्के. )प्रणिता  भगवान पवार (९७.८० टक्के) तर रोहिणी संभाजी पवार. (९५.४०२टक्के ) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तर कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाची कु. समृध्दी सुधाकर महाबळे या विद्यार्थीनीन ९८.४० टक्के गुण संपादन करीत मागासवर्गीयात  तालुक्यासह जिल्ह्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला आहे . यंदा ही सहयाद्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पारडी या शाळेने' गुणवता राखली आहे. तर संत गाडगे महाराज हायस्कूल व कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात  विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी संख्या जास्त आहेअनिकेत वापूसाहेब कापूरे (९४. टक्के ) गुण मिळविले आहेत.


२६ शाळांचा निकाल १०० टक्के -
कोरोना' मुळे यंदा एसएससी परीक्षा केंद्र व त्या अंतर्गत त्या. त्या शाळेत परीक्षा घेण्याची व्यवस्था होती त्यामूळे निकालाची शंभरी अनेक शाळांची गाठली आणि  गुणांचा फुगवटा' खूपच वाढला आहे. लोहा तालुक्यातील २६ शाळांचा १०० टक्के  निकाल लागला आहे. 

कै. विश्वनाथराव नकगे विद्यालय लोहा, शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय होहा, जि. प.हा. कलंबर, जि.प. हा. पेनूर, किसान विद्यालय, उमरा, महेश विद्यालय शेवडी (बा) संत ज्ञानेश्वर विद्यालय डोंगरगाव संत मोतीराम महाराज हायस्कूल कारेगाव, संत गाडगे महाराज कन्या शाळा कलंबर , श्री शरद पवार हायस्कूल चितळी, दीनदयाळ माध्यमिक विद्यालय बेटसांगवी, कै. राजाराम हायस्कूल टेककी, जयमहाराष्ट्र विद्यालय पांगरी, मानोझी अनुसया मा. वि. सोनखेड, श्री बलराम वैराग्य महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी, कै. गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय येळी, कै. आबासाहेब पाटील विद्यालय आडगाव, माध्यमिक विद्यालय हरसद पाटी, नंदीकिशोर नंदीकेश्वर हायस्कूल धावरी, वैशालीताई देशमुख मा.वि. माठाकोळी, ए. आर, जहागिरदार उर्दू हायस्कूल लोहा, डॉ. हेलन केलर अंध विद्यालय लोहा, नारायणा इंटरनॅशनल, लोहा नारायणा हायस्कूल लोहा ज्ञानेश्वरी प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कुल  या शाळांचा निकाल १०० टक्के आहे.

●१० च्या आत पट संख्या● तालुक्यात एकीकडे १०० टक्के इतका निकाल २६ शाळा असतानाच जि.प. हा. पेनूर या शाळेत केवळ ४ विद्यार्थी SSC परीक्षेला बसले. कै- माणिकराव पाटील हायस्कूल सुगाव (३ विद्यार्थी) वैशालीताई माध्यमिक विद्यालय माळाकोळी (३ विद्यार्थी ) ज्ञानेश्वरी इंग्लीश स्कुल (७ विद्यार्थी) मातोश्री  अनुसया विद्यालय सोनखेडे या शाळेतील केवळ २ विद्यार्थी परीक्षेत बसले व उत्तीर्ण झाले. पाच शाळांचा पट १० विद्यार्थी संख्येच्या आत होता हे विशेष 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी