नांदेड।जागतिक पातळीवर दर वर्षी आंतरराष्ट्रीय रेल्वे लेव्हल क्रॉसिंग जागरुकता दिवस साजरा केला जातो. यावर्षी आज दिनांक 09 जून रोजी आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस पाळला जात आहे. या अंतर्गत, आज नांदेड रेल्वे विभागात विविध ठिकाणी लेव्हेल क्रोसिंग गेटवर जागरुकता कार्यक्रम घेण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेने अत्युच्च दर्जाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे उच्चाटन, मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे रूपांतर मानव संचलित क्रॉसिंगमध्ये परिवर्तित करणे आणि पुलाखालील भुयारी रस्ता / पुलावरील रस्ते / मर्यादित उंचीचे भुयारी रस्ते तयार करणे यासारख्या पायाभूत सुविधा केल्या आहेत. तसेच लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेचे विविध उपाय केले आहेत. यात नांदेड रेल्वे सुरक्षा विभागाने श्री के. सूर्यनारायणा, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, नांदेड यांच्या नेतृत्वात इंजिनीरिंग, यांत्रिकी तसेच इलेक्ट्रिकल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहायाने पुढील कार्यक्रम घेतले --
१. जवळपास ४ लाख रस्ता वापरकर्त्यांना एस.एम.एस. च्या माध्यमातून रेल्वे गेट पार करतांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
२. रेल्वे क्रोसिंग च्या जवळ असलेल्या गावांमध्ये जावून सुरक्षे संबंधी घोषणा देवून जनजागृती करण्यात आली.
३. विविध रेल्वे गेट वर छापील माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. विविध रेल्वे गेटवर पोस्टर लावून जनजागृती केली गेली.
४. रेल्वे गेट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित पणे कसे कार्य करता येयील याची माहिती दिली.
५. रस्ता वापरकर्त्यांना त्यांची सुरक्षा आणि ट्रेनच्या सुरक्षिततेबद्दल समुपदेशन करून सतर्क करण्यासाठी निवडक व्यस्त लेव्हल क्रॉसिंगवर जनजागृती केली गेली.
नांदेड रेल्वे विभागाने जनजा