नांदेड। लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप करण्याचा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सेवा ही संघटन उपक्रमाला संपूर्ण भारतात फक्त नांदेड शहरात विक्रमी ४५० दिवस पूर्ण झाल्याबद्दल दोनशे आरोग्य स्वयंसेवकाचा भाजपातर्फे सन्मान करण्यात आला.
भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त देशभरात भाजपातर्फे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व राबविण्यात येत आहे. नांदेड शहरात लसीकरण सुरू झाले त्या दिवसापासून श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक शासकीय लसीकरण केंद्र नांदेड येथे एकही दिवस खंड न पडता कोरोना लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क ,सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वितरीत करण्यात येत आहे.
गुरुवारी एका समारंभात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिर्शिकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे व डॉ. हनुमंत पाटील यांच्यासह दोनशे आरोग्य स्वयंसेवकाचा शाल व मोत्याची माळ घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना संयोजक दिलीप ठाकूर यांनी हा उपक्रम नांदेडमध्ये जोपर्यंत लसीकरण सुरू असेल तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, शासकीय मदतीशिवाय एखादा उपक्रम दिड वर्षापेक्षा जास्त चालविण्याचा दुर्मिळ योग नांदेडमध्ये दिलीप ठाकूर यांच्यामुळे घडला असून त्यांनी कोरोना आपत्तीला इष्टापत्ती मध्ये परावर्तित केल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
डॉ. शिर्शिकर व अनिलसिंह हजारी यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल लालवाणी, प्रगती निलपत्रेवार यांची उपस्थिती होती. दिलीप ठाकूर यांच्यासोबत दीड वर्ष सातत्याने सेवा देणारे भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सुरेश निल्लावार व रुपेश व्यास तसेच नमो भक्त
नरेश आलमचंदानी ,सविता काबरा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन कामाजी सरोदे तर आभार अरुणकुमार काबरा यांनी मानले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसिकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. कांतीलाल इंगळे , डॉ.अभय आतनूरकर, डॉ. सोनाली जाधव, डॉ. तजमुल पटेल, डॉ. रहेमान,अधीसेविका शोभा चरडे, श्रीमती नरवाड, मारुती कदम ,उषा मुंडे, ज्योती पिंपळे, प्रशांत मुळे यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली असल्यामुळे भाजपतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देगावकर ,जुकूलवार, धनश्री गुंडाळे, संजय देवकते, श्रीकांत कोटलवार यांनी परिश्रम घेतले. दिलीप ठाकूर यांच्या आगळ्यावेगळ्या सेवा कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.