फाऊंडेशनच्या वतीने गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप -NNL


नांदेड।
निनाद फाऊंडशेनच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले असून, चालू शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाल्यानंतर या फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व होतकरू विद्याथ्र्यांना शैक्षणिक मदती अंतर्गत पाठ्यपुस्तके व वह्यांचे वाटप करण्यात आले.

निनाद फाऊंडेशन नांदेडच्या वतीने गेल्या चार वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यात दरवर्षी होणारे रक्तदान शिबीर, गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना फाऊंडेशनच्या वतीने मदत, तसेच दरवर्षी शैक्षणिक साहित्यांचे वाटप असे उपक्रम सातत्याने सुरु आहेत. शालेय स्तरावर आठवीपर्यंतच्या विद्याथ्र्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळतात. मात्र नववी आणि दहावीच्या विद्याथ्र्यांना मात्र विकत घ्यावी लागतात. 

अशा गरजू विद्याथ्र्यांचा शोध घेवून फाऊंडेशनने अशोक माध्यमिक शाळा नांदेड, डॉ.नारायणराव भालेराव हायस्वूâल नांदेड, शंकरराव विद्यालय रहाटी ता.नांदेड, व्यंकटराव तरोडेकर हायस्वूâल नांदेड येथील गरजवंत मुले शोधली. त्यातील नववी व दहावीमधील प्रत्येकी ४० अशा ८० विद्याथ्र्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांचा संच प्रत्येकी दहा वह्या व पाच पेनांच्या सेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व संबंधित शाळेचे अध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी