अपघातात जखमी झालेल्या हरणाला वाचविण्यासाठी हिमायतनगर पोलिसांचे प्रयत्न; शेवटी झाला मृत्यू -NNL

उपचार झाल्यानंतर जंगलात सोडण्यापूर्वी हरिणाचा झाला मृत्यू


हिमायतनगर।
 .हिमायतनगर। पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक विजय आऊलवार, डीएसबीचे कुलकर्णी किनवट तालुक्यात तपासासाठी जात असताना कार्ला परिसरात अज्ञात वाहनाने जखमी झालेलं हरीण तडफडत असतांना आढळून आले, क्षणाचाही  विचार न करता तात्काळ त्या हरणास पोलीसगाडी मध्ये टाकून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे दाखल केले. डॉ सोनटक्के यांनी उपचार केले मात्र हरणाचे पाडस दगवल्याने चौधरी यांचा प्रयत्न असफल झाला असला तरी वन्यप्राण्यास वाचविण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की , हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून आभाळात नभ दाटून येत आहेत, त्यामुळं वातावरणात असलेल्या गराव्याने वन्य प्राणी रांनशीवार व रस्त्यावर सैरभैर पळत सुटले आहेत.  तालुक्यातील मौजे कार्ला - वडगाव शिवारात दि 28 जून रोज मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास एक हरीण राष्ट्रीय महामार्गावर आल्याने तकोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात जखमी झालेले हरणाचे पाडस आपला प्राण वाचविण्यासाठी जखमी अवस्थेत धडपडत होते.


त्या हरणास येथील नागरिकांनी पाहिले पण कुणी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. तितक्यातच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक विजय आऊलवार व कुलकर्णी हे पोलीस तपासासाठी कार्ला वडगाव मार्गे किनवट तालुक्यातील इस्लापुरला जात होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेले हरिण जिवाच्या आकांताने तडफडत असल्याचे पाहताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उचलून पोलीस गाडीतून हिमायतनगर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्या हरणावर डॉ सोनटक्के यांनी हरिणावर प्राथमिक उपचार केले. परंतु त्या हरिणाचा उपचार करून वनकर्मचार्यांच्या ताब्यात दिले, मात्र हरीनास जंगलात सोडण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

हिमायतनगर येथील पोलिसांनी तातडीने हरणाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न असफल झाले असले तरी त्यांची वन्यप्राण्यास वाचविण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद असल्याच्या भावना वन्यप्रेमी नागरिकांनी बोलून दाखविली आहे. कुठेही अपघातात वन्यप्राणी जखमी झाल्यास त्यांना वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊनतातडीने वानविभागास सुचना करावी आणि वन्यजीव प्रति आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन वनपाल अमोल कदम यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी