जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतीम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध - जिल्हाधिकारी डॉ. विपीन -NNL

जिल्हा नियोजन समितीची बुधवारी बैठक 

नांदेड।
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी अंतीम प्रभाग रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. 

या प्रस्तावास विभागीय आायुक्त औरंगाबाद यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यासंदर्भातील अंतीम प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हा व तालुका मुख्यालयी  27 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन समितीची बुधवारी बैठक 

नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार 29 जून 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी