नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या वाडी येथील वेलिंग्टन विद्यालयाने यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनोद पावडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. नुकतेच इयत्ता दहाविचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
वेलिंग्टन विद्यालयाने यावर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेची विद्यार्थ्यांनी दिक्षा स्वामी हिने 98.20 टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला क्रमांक पटकावला, साक्षी हिवराळे हिने 96.40 टक्के गुण घेऊन द्वितीय तर अंजली शिंदे या विद्यार्थीनीने 95.20 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच भक्ती पांपटवार 95, उमा लिंबोळी 94.40, स्वागत पवार 94.40, व्यंकटेश डोके 94.40, श्रुती कोठारे 92.80, अजित देसाई 92.80, सोहम सोनटक्के 92.40, शिवानी पुयड 92.6, श्वेता वरवंटकर 90.20, निखिल लांडगे 90.20, वेदांत रायपल्ले 90.6, ऐश्वर्या पाकलवाड 89.40, महेश्वरी खेबाळे 89, विषाल मुंडे 89, गीता सूर्यवंशी 87, गौरव कांचनगिरे 84.80, गणेश पावडे 83, रामकृष्ण पाटील 82.60, कोमल राठोड 82, निर्जला दुरपडे 81, आशिष पावडे 80, निकिता एमेवाड 80, विश्वजीत कर्हाळे 80 तर महेश चव्हाण या विद्यार्थ्याने 66 टक्के गुण घेवून यश प्राप्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे सल्लागार निळकंठराव पावडे, अध्यक्ष विनोद पावडे, वैशाली देशमुख, विशाल पावडे, शकुंतला देशमुख, सिंधुताई पावडे, दीपाली पावडे, वर्षा पावडे, संस्थेचे मुख्य अधिकारी चलपतीराव, प्राचार्य सतीष सिरसाठ, उपप्राचार्य मंजुषा पावडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.