श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल -NNL


जोशीसांगवी|
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाचा उत्तुंग आलेख आणि यश व ध्येयप्राप्तीची वाटचाल करण्यासाठी आदरणीय अनिल पाटील शेळके साहेब यांचे मार्गदर्शन आणि बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालयाची मेहनत आज फळाला आली.

आम्ही करतो पालकांची व विद्यार्थ्यांची स्वप्नांपूर्ती आणि त्यांना मूर्तरूप प्राप्त करून देण्यासाठी घेतो ती मेहनत. यामुळेच वर्षानुवर्ष बाळब्रह्मचारी विद्यालयाचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतांना दिसतोय. आजच्या या निकालात एकूण ३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत क्षमता सिद्ध करत अकाशाला गवसणी घातली आहे. या निकालात एकूण ३७ पैकी ३२विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह (९०%च्या वर) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. बाळ ब्रम्हचारी विद्यालयाच्या  या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यशस्वी व गुणवंत विद्यार्थी १)कु.अंकिता बाबूराव बंतलवाड, प्रथम(95.40%), २)कु.थोटे ऋतूजा नवनाथ व्दितीय(95.20%), ३)कु. कोकुलवार अर्चना विजय तृतीय(94.60%) , ४)थोटे सुषमा मलिकार्जून तृतीय(94.60), ५)लोंढे कांचन गणेश चतुर्थ(93.20%) सर्व गुणवंत, यशवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव मा.श्री.अनिल पाटील शेळके साहेब, शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मनोज पाटील मोरे साहेब, मुख्याध्यापक मा.श्री गोविंद गायकवाड सर, शाळेचे शिक्षकवृंद श्री.वडवळे शिवानंद सर,श्री.वाघमारे राजू सर,श्री.म्हेत्रे संभाजी सर, श्री.कोकतरे दत्तू सर,श्री. मस्के संतोष सर(लिपिक) व शिक्षकेत्तर कर्मचारी आनंदवाड बाळू,मोरे शिवराज, भिसे नागोराव, संजय दुलेवाड सर्व स्टाफने तसेच जोशीसांगवी,लोंढे सांगवी ग्रामस्थांनी विविध माध्यमातून गुणवंताचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालिस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी