हिमायतनगर। आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक प्रहार जनशक्ती पक्ष सर्व ताकदीने लढविणार असल्याचीमाहीती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक का समीप येत असल्याने सर्वच राजकीय पक्ष व तसेच संघटना निवडणूकीत उतरण्याची जोरदार तयारी करित आहेत. यात आमचे नेतृत्व बचुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीनेही जय्यत तयारी चालविली जात आहे.
मी प्रहार जनशक्ती पक्ष हिमायतनगर तालुकाप्रमुख दत्ता पंडितराव देशमुख या नात्याने पक्षाचे ध्येय धोरणे लक्षात घेऊन हिमायतनगर तालुक्यातील पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करित आहे. यामुळे तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे, प्रचंड जनसमुदायाची ओळख अन सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे तालुका प्रमुख म्हणून दत्ता देशमुख यांची ओळख निर्माण झाली आहे.
त्यामुळे जनतेची साथ व समर्थन मिळत असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकी बाबत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, वरीष्ठ नेते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होवू घातलेल्या जि.प. व तसेच पं. स. निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने उतरून स्वबळावर निवडणूका लढवून जिंकणार असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाप्रमुख दत्ता पंडितराव देशमुख यांनी व्यक्त केले.