नविन नांदेड। सिडको हडको परिसरातील प्राथमिक शाळाना आज पासून सुरूवात झाली असून अनेक शाळा मध्ये गुलाबाचे पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले तर अनेक शाळा परिसर गजबजलेल्या दिसला.
१५ जुंन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली,प्राथमिक शाळा पहिला दिवस , विद्यार्थ्यांसाठी उत्साहाचा दिवस ,शाळा परिसर गजबजलेल्या दिसल्या तर शाळांचा वतीने गुलाब पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, अनेक शाळा मध्ये मोफत पाठ्यपुस्तके वाटप यासह अनेक ऊपकमाने शाळा सुरूवात झाली.
शाळा सुरू होणार या अनुषंगाने १३ जुनं पासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यांनी शाळा परिसर व बाह्य विभाग अंतर्गत विभाग साफ सफाई सह , स्वागत तयारी, हजेरी व मोफत पाठ्यपुस्तके वाटप तयारी केली होती,१५ जुंन रोजी आई वडील,आजोबा आजी व नातेवाईक सोबत आलेले अनेक विद्यार्थी आज शाळेत आले,स्वागत झाले, प्रार्थना झाली व वर्गात प्रवेश केला, हजेरी झाली व अभ्यासला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी चेहरावर आंंनद दिसुन आला.