‘स्वारातीम’ विद्यापीठ व आयसीएसआय यांच्यात डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार -NNL


नांदेड।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया-(आयसीएसआय) यांच्या दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिएस देवेंद्र देशपांडे यांच्या उपस्थितीत दि. २६जून रोजी औरंगाबाद येथे सामंजस्य करार पार पडला. 


या सामंजस्य करारामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखीय व विद्यापीठाच्या सेक्शन ८ कंपनीमधील संशोधकांना, उद्योजकांना व शिक्षकांना उपयोगी पडणार आहे. या करारामुळे देशपातळीवरील आयसीएसआय संस्थेचा अभ्यासक्रम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ते क्रेडिट ट्रान्सफर साठी उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर देशपातळीवरील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा करार शिक्षण संस्था, उद्योजक व सामुदायिक संस्थामध्ये सामंजस्य साधण्यास पोषक ठरणार आहे. 


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या करारासाठी डॉ. राजाराम माने,डॉ. राजेश शिंदे, डॉ. दिगंबर नेटके,डॉ.वाणी लातूरकर हे उपस्थित होते. हा करार पूर्ण करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, सिएस परेश देशपांडे, समृद्धी लुणावत यांचे विशेष सहकार्य लाभले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी