आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयातील निर्लेखित वाहन व साहित्याचा गुरुवारी लिलाव -NNL


नांदेड |
निर्लेखित कार्यालयीन साहित्य व शासकीय वाहन टाटा सुमोची बोली लावून विक्री करावयाची आहे. बोली लावणाऱ्या व्यक्तींनी गुरुवार 30 जून 2022 रोजी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट गोकुंदा रेल्वे गेट जवळ, किनवट येथे दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे. 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यालयातील जुने निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या जडवस्तु जसे लोखंडी कपाट, लोखंडी टेबल, लोखंडी रॅक, लोखंडी खुर्च्या, लोखंडी व लाकडी मिश्रित साहित्य व इतर साहित्य तसेच या कार्यालयाचे शासकीय जुने वाहन क्र. एमएच 15 एए 0070 टाटा सुमो (2001 चे मॉडल) हे वाहन स्क्रॅप मध्ये या कार्यालयाकडून निर्लेखन करण्यात आलेले आहे. सदर साहित्याची लिलावात बोली लावून विक्री करावयाची आहे. 

लिलावात भाग घेणाऱ्यांनी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे. शासकीय किंमतीपेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. बोली बोलणाऱ्या व्यक्तींनी बोली बोलण्याच्या पूर्वी 2 हजार रुपये अनामत रक्कम म्हणून कार्यालयाचे रोखपाल यांच्याकडे जमा करुन पावती घ्यावी. अनामत रक्कमेची पावती घेतल्या शिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. अनामत रक्कम भरतांना आपले नावाचे आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स अनामत रक्कम भरण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडण्यात यावी. 

लिलावाद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या वाहनांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. वाहनाचे नाव-टाटा सुमो, इंधनाचा प्रकार-डिझेल, वाहन खरेदी वर्ष -2001, वाहनाचे आयुर्मान-15 वर्षे, वाहन इंजिन क्रमांक-483 डीएल 47 एमझेडझेड 778630, वाहन चेसिस क्रमांक-418005 एमझेडझेड 926934.  लिलावाद्वारे विक्री करण्यात येणारे कार्यालयातील जुने साहित्य (कपाट, टेबल, खुर्च्या इत्यादी), असे किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी