नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड..! एकल प्लास्टिक वापरावर बंदी /न.पा.मुख्याधिकारी दामोधर जाधव -NNL


हदगाव|
प्रथम वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तुचे साठा करणाऱ्या वाहतुक वितरण विक्री वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. वापर करतांना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती हदगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी दामोधर जाधव यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सागितले.

याविषयी अधिक माहीती देतांना त्यानी सागीतले. सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल प्लास्टिक तथा मिठाई बाँक्स पाँकींग करिता वापरात येणारे प्लास्टिक निमंत्रण कार्ड व प्लास्टिकचे झेंडे प्लास्टिक बँनर प्लास्टिक प्लेटस कप ग्लास चमचे सजावटी करिता वापरले जाणारे थर्माकोल व आदीसहीत्याचा बंदी मध्ये समावेश करण्यात आलेलं आहे. तसेच एकल प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही. 

विघटन प्रक्रियेत अनेक वर्षाचा काळ लागतो परिणामस्वरुप पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याने एकल वापर प्लास्टिक करिता विशेषतः बंदी घालण्यात आली आहे. या बाबतीत दंडाची पण तरतुदी करण्यात आल्याची माहीती ही एका प्रश्नाच्या न.पा.चे.मुख्याधिकारी जाधव यांनी दिली आहे. प्लास्टिक वस्तूऐवजी कापडी पिशव्या कागदाच्या पासुन बनविलेले पिशव्या निसर्गपूरक वस्तुचा वापर करावा असे अहवान त्यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी