हिमायतनगर। तालुक्यातील मौजे दिघी येथील गरीब, होतकरू कुटुंबातील कुमारी नयना लक्ष्मण गायकवाड या विद्यार्थिनी तालुक्यातून मागासवर्गीय गटामधिल मातंग समाजातील तालुक्यातून दहावी परिक्षेत 80 गुण मिळवून यश संपादन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून तिने आई वडिलांचे नाव उज्वल केल्याने सर्व स्तरातून तिचे तोंड भरून कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.
ती मौजे विरसणी येथील विद्यालयाची विद्यार्थिनीअसून यावर्षी दहावी परीक्षेत ८०.०० टक्के गुण प्राप्त केले आहे.तर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड यांची पुतणी आहे.यामध्ये मराठीत मराठीत ८७ हिंदीत ६४ इंग्रजीत ५७ तर सामाजिक शास्त्रात ९० असे ५०० पैकी ४०५ गुण प्राप्त केले आहे. या यशाचे श्रेय वडील लक्ष्मण गायकवाड,आई उज्वलाबाई गायकवाड, आजोबा संभाजी गायकवाड, गणपतराव गायकवाड, मौजे विरसणी येथिल परमेश्वर विद्यालयांचे मुख्याध्यापक जाधव सर, एम.एस.सूर्यवंशी, आर.के.कदम,एस. एन.तालेवार, टि.एन.भेलोंडे, एन.जी. गंगासागरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचं तिने सांगितले.
यावेळी दहावीत घवघवीत यश प्राप्त करून गायकवाड परीवारांचे नाव उज्ज्वल केल्यामुळे कु.नयना गायकवाड दिघीकर हिंचा शाल, श्रीफळ, हार घालून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड दिघीकर परिवारातील सदस्यांनी भव्य असा सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तिला मोबाईल फोनवरून लोकस्वराज्य आंदोलनाचे तालुकाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे,संतोष हातवेगळे सामाजिक कार्यकर्ते,संतोष बनसोडे, संतोष आंबेकर मंगरूळ ग्रामपंचायत सदस्य, तानाजी हातावेगळे, विजय वाठोरे सरसमकर पत्रकार, आदींनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.