अर्धापूर शहर पाणीपुरवठा योजनेमुळे टॅकरमुक्त - छत्रपती कानोडे -NNL

पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यास सुरळीत पाणीपुरवठा


अर्धापूर, निळकंठ मदने।
शहरासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून २७ कोटींच्या योजनेमुळे उन्हाळ्यात अर्धापूर शहर टॅकरमुक्त झाले असून,या योजनेचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यास शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी दिली.

अर्धापूर शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर टॅंकर होते,महिलांना पीण्याच्या व सांडपाण्याच्या पाण्यासाठी अतोनात त्रासाला समोरे जावे लागत असे,हा प्रकार पाहून ना.अशोकराव चव्हाण यांनी शहरवासीयांना शुध्द पाणी पुरवठा मिळावा, तब्बल ८ कि. मी. अंतरावरील निमगाव येथील इसापूर धरणाचे त्यांचे निमगाव तलावात साठवून हे पाणी वितरीकेचे पाणी बंद झाल्यानंतर शहरवासीयांना देण्यात येणार आहे,या योजनेला २८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून ही योजना आणली, इसापूर धरणाचे कालव्याला येणारे पाणी शहरात आणण्यासाठी व  निमगाव येथील विहीरीवरील १२० एच पी च्या तिन पंप जोडण्याचे काम सुरू असुन,या पंपाद्वारे उर्धपैनगंगा प्रकल्पाचे पाणी तळ्यात सोडण्यात येणार आहे.

पावसाळ्यात तळ्यातील पाण्याची पातळी वाढल्यावर अर्धापूर शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे, व विहीरीतून विना पंपाद्वारे पाणी शहराला पाइपलाईन व्दारे मिळत आहे,या योजनेचे पाणी २ एप्रील ला पाडव्याच्या मुहूर्तावर नळजोडणी देण्यास प्रारंभ केला आहे,ऐन उन्हाळ्यात या योजनेचे पाणी शहरवासीयांना मिळाल्याने शहरात पहिल्यादाच टॅंकर मुक्त शहर झाले असून,या योजनेचे पुर्ण काम होण्यासाठी काही वेळ लागणार असून,पुर्ण काम झाल्यास शहरवासीयांना शुध्द पाणी पुरवठा मिळणार आहे, एवढ्या उत्तमप्रकारे योजणेचे काम सबंधीताने करण्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य केले आहे, याप्रकरणी शहरवासीयांनी अफवावर विश्र्वास ठेवू नये अशी माहिती नगरपंचायत चे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी