हिमायतनगरच्या जिल्हा परिषद् उर्दू व मराठी शाळेकड़े आमदार जवळगावकरानी लक्ष देण्याची मागणी -NNL


हिमायतनगर।
शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद् उर्दू मराठी मेडियम शाळेची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने येथील शाळा डाक डूगीच्या अवस्थेत आहे. परिणामी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यामुळे शाळेची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आली असून, शहरातील शासकीय जिल्हा परिषद् शाळा वाचविन्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणप्रेमी पालक वर्गातून व्यक्त केल्या जात आहे.

अत्यंत पुरातन आणि शेकडो अधिकारी कर्मचारी व यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या आकारावरील जिल्हा परिषद शाळेला अवकाळा आली आहे. इ. सन 1994 मध्ये हिमायतनगर शहरात जिल्हा परिषद् हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर होते. त्यावेळेस हिमायतनगर येथील उर्दूचे प्रसिद्ध पत्रकार असद मौलाना यांनी पाच दिवसाचे आमरण उपोषण करून येथील शाळा पुन्हा चालू करायला लावली होती. येथील शाळेत शिक्षण व्यवस्था वाढवा व् शिक्षकांची भर्ती करा ह्या मागणीसाठी त्यांच्यासह अनेकांनी संघर्ष केल्यामुळे हिमायतनगर जिल्हा परिषद् शाळा आजपर्यन्त जीवंत आहे. पण शिक्षण विभाग व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद् शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. ह्याचा फटका येथील गोर गरीबांच्या लेकरांना बसणार आहे त्यांना विना मूल्य निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवन्याचे काम येथील राजकीय मंडळी सह खाजगी संस्था चालकांकडून होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जिल्हा परिषद् शाळा नांदेड येथील मल्टीपर्पस हायस्कूल, किनवट येथील जिल्हा परिषद् शाळा बंद झाल्याने खाजगी शाळांनी येथे आपला मनमानी करून शाळेच्या फिच्या नावावर हजारों लाखोंची लूट करण्याच्या गोरख धंदा सुरु केला आहे. त्यामुळे गोर गरीबांची लेकरे शिकावी तर कुठे शिकावी ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील जिल्हा परिषद शाळा हे गरीबांच्या लेकरांसाठी आज पर्यंत वर्दान ठरत आली आहे. त्यामुळे ती जिल्हा परिषद् उर्दू मराठी शाळा वाचविन्याची आजच्या काळाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील मुलांच्या उज्वल भविष्यसाठी व् शिक्षणाला उच्च स्तरावर नेण्यासाठी जिल्हा परिषद शाळाकड़े विद्यमान आमदार माधवराव पाटिल यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील पालकांनी केली आहे.

जिल्हा परिषद् शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आज जिल्हा परिषद् शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आमच्या मुलांच्या उज्वल भविष्यसाठी व् शिक्षणाला उच्च स्तरावर आणण्यासाठी जिल्हा परिषद् शाळाकड़े आमदार माधवराव पाटिल यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस.डी.अमेर यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी