लोहा| यंदा मृग नक्षत्रात मोसमी पाऊस लांबला आहे .काही भागात पाऊस होतो आहे पण तो पेरणी साठी उपयुक्त नाही पेरणी योग्य पाऊस झाल्या नंतरच पेरणी करावी. असे आवाहन बीडीओ शैलेश वाव्हूले यांनी केले आहे.
विशिष्ट कंपनीचे खते व बियाणे आग्रह न करता दर्जेदार खते व बियाणाची खरेदी करावे. सध्या खरीप हंगामाचे शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. शेतकरी बंधूनी खरेदी करताना खालील बाबींची काळजी घ्यावी. अधिकृत कृषी सेवा केंद्रातून बियाणे व खतांची खरेदी करावीत. विशिष्ट कंपनीचा खते व बियाणाचा आग्रह धरू नये सोयाबीनच्या बॅगची आदळआपट करू नये 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पे,रणी करावी असे आहवान करण्यात आले आहे.
सोयाबीन पेरणी करताना बीज प्रक्रिया करून पेरावे. पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर खोल करावी बियाण्याची बॅग फोडताना उलट्या दिशेने फोडावी बिल व बॅग सांभाळून ठेवावे शक्य असेल तर थोडी बियाणे जपून ठेवावे. अशा प्रकारचे आवाहन गटविकास अधिकारी श्री शैलेश वावळे कृषी अधिकारी पंचायत समिती व कृषी अधिकारी कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.