नविन नांदेड। जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गोपाळ चावडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ऊपसंरपच साहेबराव सेलुकर व ग्रामसेवक बि.एन.पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी येथील जिल्हा परिषद शाळा गोपाळ चावडी येथे प्रांरभी सवित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ऊपसिथीत विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकट पाटील, ऊपसंरपच साहेबराव सेलुकर, ग्रामविकास अधिकारी बि.एन.पवार, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, मुख्याध्यापक कंधारकर .एस.यु. व शिक्षक ए.डी.लांडगे, कांबळे .आर.जि. लिपीक आर्शिवाद डाकोरे यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय गोपाळ चावडी यांच्या वतीने ऊपसंरपच साहेबराव सेलुकर व ग्रामसेवक बि.एन.पवार लिपीक आशिर्वाद डाकोरे यांनी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन व खाऊचे वाटप केले.