बिलोली। बिलोली- कुंडलवाडी-हुनगुंदा -धर्माबाद मानव विकास बससेवेचा सुरू करणार असल्याची माहिती बिलोली येथील आगार प्रमुख श्री सुभाष पवार यांनी दिली.
बिलोली येथील बस सेवा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या कुवत आणि क्षमतेप्रमाणे प्रयत्न करत आहे. मागील आंदोलनामुळे बससेवा पूर्णतः विस्कळीत झाली होती. विस्कळीत बस सेवेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांचे हाल झाले होते.बिलोली- कुंडलवाडी-हुनगुंदा - धर्माबाद मानव विकास बससेवेचा सुरू करण्याविषयी
मजविप नांदेड शाखेचे अभ्यासगट प्रमुख भाऊराव मोरे यांचेकडे विद्यार्थी आणि पालकांनी मागणी केली होती. बिलोली व धर्माबाद तालुक्यातील ७ गावातील जवळपास ८० विद्यार्थी- विद्यार्थिनी धर्माबाद शिक्षणासाठी खाजगी वाहनाने ये-जा करतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वाहन वेळेवर मिळत नसे. शिवाय खाजगी वाहनांचे अधिकचे भाडे शेतक-यांच्या मुलां-मुलींना देणे परवडत नाही.अशी मागणी भाऊराव मोरे केली.
विद्यार्थ्यांची रास्त मागणी लक्षात घेऊन आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचे पत्र प्राप्त झाल्याने बिलोली येथील आगार प्रमुख सुभाष पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. नायगाव बाजार येथे वास्तव्यास असलेले निवृत्त मुख्याध्यापक तथा मराठवाडा जनता विकास परिषदेचे नांदेड जिल्हा स्तरीय सक्रिय सदस्य आणि अभ्यास गट प्रमुख भाऊराव मोरे यांच्या विद्यार्थ्या प्रती असलेल्या भावनांच्या बाबतीत अनेकांनी कौतुक केले आहे.