नांदेड। शहरामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिक आक्रमक झालेले पहावयास मिळाले आहे. नांदेड उत्तरचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचे कार्यालय, घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी प्रयत्न केला. यावेळी अडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली आहे.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक येऊन स्वार्थासाठी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी काही शिवसैनिकांनी शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवले