बिलोली तालुक्यातील घटना
बिलोली, गोविंद मुंडकर| शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखर्णी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा गळा दाबून खुन करण्यात आला आहे.खुन केल्यानंतर मयत महिलेच्या अंगावरील सोना चांदीचे दागिनेही लंपास केल्याची घटना दि.१६ जुन रोजी घडली आहे.सदर घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून पोलिस तपास करत आहेत.
मयत गंगाबाई राजेप्पा बोडके वय ६५ वर्ष या बिलोली तालुक्यातील पोखर्णी येथे एकट्याच राहत असत.दि.१५ जुन च्या राञी १० ते पहाटे पाच वाजेच्या सुमारास गंगाबाई बोडके या घरात एकट्याच असल्याचे पाहून अज्ञात आरोपीने गंगाबाईच्या घरात घुसून तीचा गळा दाबून खून केला.खुना नंतर अज्ञातांनी गंगाबाई यांच्या अंगावरील ६७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जबरीने चोरून पळ काढला.
याबाबात यादवराव हनमंतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस स्थानकात गुरन १५७/२०२२ कलम ३०२,३९४ भादवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हे करत आहे.शहरापासून जवळच असलेल्या एका लहानशा गावात एकटी राहणाऱ्या महिलेचा खुन करून दागिने लंपास झाल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली असून प्रत्येक गावात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी होत आहे.