मुखेडमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न -NNL

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.बी अडकिणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार संपन्न


मुखेड, रणजित जामखेडकर।
तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशस्वी झाले आहेत . त्या निमित्ताने महाविद्यालयाकडून त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख पाहुणे संस्थेचे शंकरराव बसापूरे , प्रा.सी.बी.साखरे , पर्यवेक्षक प्रा.जी.एम.वायफणकर , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , पालक कांबळे हे उपस्थित होते . शै वर्ष २०२१ -२२ मध्ये महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.२७ टक्केवारी आहे . या दैदिप्यमान यशामध्ये महाविद्यालयाचे कला , वाणिज्य , विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश आहे . विज्ञान ९९ टक्के , वाणिज्य ९३.७५ , कला ९३.५० , व्यवसाय अभ्यासक्रम ९०.९० टक्के हा विविध शाखेचा निकाल जाहीर झाला आहे . 

विज्ञान शाखेतून सर्वप्रथम पठाण इरफान मुजीब (८३.६७ टक्के ) , द्वितीय माळगे नेहा शिवाजी (८२.५० टक्के ) , कांबळे कोमल विश्वांभर (८२.५० टक्के) , तृतीय गवते निकिता रामराव ( ८१.६७ टक्के ) , चतुर्थ पाटील प्रिती केशव ( ८१.५० टक्के ) , कला शाखेतून शेख सानिया युसुफसाब (८० टक्के ) , द्वितीय शिंदे रूपाली सुधाकर (७९.१७ टक्के ) , तृतीय गायकवाड गणेश गोविंद ( ७६.३३ टक्के ) , चतुर्थ पाटील कपिल व्यंकटराव ( ७५.८३ टक्के ) , वाणिज्य शाखेचा प्रथम माडेवार पुजा दत्ता ( ७६.५० टक्के ) , द्वितीय पाटील रोहिणी रामचंद्र ( ७६.३३ टक्के ) , तृतीय पुटवाड मंजुषा देवराव ( ७५.३३ टक्के ) , चतुर्थ करकेलवार माधव हरिदास (७३.५० टक्के ) आणि व्यवसाय अभ्यासक्रमामधून प्रथम शेख अफरोज आजमुद्दिन ( ७४.५० टक्के ) , द्वितीय शेख बालेसाब राजेसाब ( ६८ टक्के ) , तृतीय वाघमारे नागेंद्र शिवाजी ( ६६ टक्के) गुण मिळवून महाविद्यालयाच्या यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली . यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे विद्यार्थिनीने अधिक यश संपादन केलेले आहे .

मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतांचा स्मृतिचिन्ह , पुष्पहार देऊन पालकां समवेत सत्कार सोहळा पार पाडण्यात आला . या यशासाठी सर्व शाखेतील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे . त्यामुळे विद्यार्थी , पालक , संस्था व प्राचार्य या सर्वांनी यशाचे श्रेय त्यांना दिलेले आहे . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी , पालक आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती लक्षणीय होती .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी