शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडकोने बारावीच्या सर्वोच्च निकालाची परंपरा कायम राखली..NNL


नवीन नांदेड।
महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १२ वी चा निकाल घोषित झाला आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी व्दारा संचलित शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय सिडको-नवीन नांदेड या विद्यालयाने यदांही नवीन नांदेड विभागात शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत सर्वोच्च निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.४२% कला शाखेचा निकाल ९२.८५% तर एकत्रित विद्यालयाचा निकाल ९६.७२% लागला आहे.

विद्यार्थ्याच्या या उज्वल शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव नागोराव जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष रवी जाधव, प्राचार्य व्ही. के. हंगरगेकर, पर्यवेक्षक श्री. एन. एम. भारसावडे, वरिष्ठ लिपीक वसंत वाघमारे, एस.जी,भवर यांनी विद्यार्थी आणि पालकांचे हार्दीक अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयात विज्ञान आणि कला शाखतून एकुण १८३ परीक्षार्थी प्ररिक्षेस बसले होते. त्यातील १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील विशेष प्राविण्यासह ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रथम श्रेणीत १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा विज्ञान शाखेतून गुणानुक्रमे विद्यालयात प्रथम येण्याचा मान उत्तरवार वरद प्रसन्ना ९२.८३% मिळवला, व्दितीय स्थानी शिवम राम सूर्यवंशी ९०.३३% तर तृतीय स्थानी संयुक्तपणे वझरकर वरुन विवेकराव ८६.८३% आणि जाधव नितीशा नारायणराव ८६.८३% उत्तीर्ण झाले आहेत,तर कला शाखेतून गुणानुक्रमे प्रथम ढेंबरे अनुजा रोहिदास ८४.६७%, व्दितीय जाधव, वैष्णवी राजू- ८४% तर तृतीय स्थानी भवर संध्या प्रभाकर ८२% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

या यशाबद्दल विद्यार्थी व पालक यांचे प्रा.बी.ए शिंदे,प्रा.एस.एम. देवरे, प्रा.एस.एस.तुप्पेकर, प्रा.ए.बी.सय्यद, प्रा.एम.डी. रगडे, प्रा. विलास जाधव, के. एल.जोगदंड, डी.जी.पवार, शंकर कापसे, बाबुराव सिंगनवाड सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडकोचा निकाल 100टक्के

श्री शारदा इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, येथील एच. एस. सी. परीक्षा मार्च | एप्रिल 2022 चा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असुन यशाची पंरपरा कायम राखत या कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरात गुणवत्ता मध्ये वर्चस्व कायम ठेवले आहे.

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षा निकाल घोषित झाला असून यात विशेष प्राविण्य- 48.विशेष प्रथम श्रेणी - १३ द्वितीय श्रेणी -05 व कला शाखेचा 90%  लागला असुन यात (वि. प्राविण्य- 07, प्रथम श्रेणी - 79 व द्वितीय श्रेणी 50 ) लागलेला आहे. सिडको परीसरात इंदिरा गांधी कनिषठ महाविघालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण  (महाराष्ट्र राज्य सार्वजनीक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री) तसेच संस्थेच्या उपध्यक्षा मा. सौ अमिता भाभी चव्हाण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री डि. पी. सावंत, सहसचिव अंड. उदय निंबाळकर ,शेंदारकर कोषाध्यक्ष, प्राचार्य डॉ. रावसाहेब कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चहाण, कार्यकारिणी सदस्य पांडूरंग  पावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. माचलोड एस.एल  प्रा.नांदेडकर आर.टि व सर्व स्टाफ व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कुसुमताई उच्च माध्यमिक विद्यालय सिडकोचे बारावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी बारावी बोर्ड मार्च 2022 मध्ये घेतलेल्या परिक्षेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कुसुमताई उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ठ यश संपादन केले आहे.

बारावी विज्ञान शाखेचा निकाल 99.32 टक्के लागला आहे. यामध्ये 08 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्त्तीर्ण झाले आहेत. 86 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये व 53 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बारावी कला शाखेचा निकाल 90.14 टक्के लागला आहे. यामध्ये 5 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 29 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 89 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव संभाजीराव बिरादार, सहसचिव सौ.शशीकला बिराद्वार प्राचार्य कमलाकर जोशी,पर्यवेक्षक एस जे. चाटे, प्रा.कालीदास जाधव प्रा.भागवत हरे. सौ.सुनंदा कराड. प्रा.सौ.संगीता मांजरे, प्रा. सौ.अरुणा क्षीरसागर, प्रा.अंगद केंद्रे, प्रा.अशोकराव खुडे प्रा. लक्ष्मण कांबळे, प्रा राजेश शिरफुले प्रा.रामेश्वर जाधव, प्रा. वंदना चव्हाण व प्रा सौ. वंदना शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी