प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात -NNL


नांदेड।
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील  पॉलिटेक्निक पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इयत्ता दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल लागण्यापूर्वीच सदर प्रवेशासाठी ची नोंदणी करू शकतील नोंदणीही ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकते.

मागील तीन वर्षापासून पदविका प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत सुलभ अशी प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. सुविधा केंद्रांवर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आगामी वर्षातील पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्राची तसेच सर्व समुपदेशन केंद्राची सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर   प्रत्यक्ष तपासणीसाठी सदरील अर्ज सुविधा केंद्रावर उपलब्ध सर्व मूळ कागदपत्रांसह तपासून निश्चित करून घ्यावा. ई- तपासणी स्वीकारली असल्यास वेळोवेळी ऑनलाईन येणाऱ्या त्रुटीची पूर्तता करावी.


प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

 सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी जन्म प्रमाणपत्र इयत्ता दहावीचा निर्गम उतारा असणे आवश्यक आहे.

 अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. इतर मागास वर्ग विशेष मागासवर्ग तसेच भटक्या जाती व जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र  (मार्च २०२३ पर्यंत चालणारे )असणे आवश्यक आहे. याशिवाय आदिवास प्रमाणपत्रआवश्यकतेनुसार अपंगाचा दाखला, संरक्षण दलात पालक असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्रआर्थिक दृष्ट्या दुर्बल  प्रवर्गासाठी चे प्रमाणपत्रअल्पसंख्यांक  यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र.

 वेगवेगळ्या वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती प्रवेश पुस्तिकेत दिलेली आहे सदरील पुस्तिका ऑनलाइन http://www.dtemaharashtrea.gov.in  येथे उपलब्ध आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी