लोहा। मराठवाड्यातील पहिली मागासवर्गीय सूत गिरणीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.माजी आ विठ्ठलराव गायकवाड व रिपाई चे माजी प्रदेशाध्यक्ष गौतमदादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ही सूतगिरणी नव्वदच्या दशकात पेठशिवाणी (ता.पालम) येथे सुरू झाली संस्थापक यांच्या पश्चात झालेल्या पहिल्या निवडणुकीत डॉ सिद्धार्थ भालेराव यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. यात लोहा तालुक्यातून आडगाव येथील कार्यकर्ते दिलीप महाजन धनसडे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची स्थापना माजी आ विठ्ठल पुरभाजी गायकवाड व रिपाई (आ) चे माजी प्रदेशाध्यक्ष ऍड गौतमदादा भालेराव यांनी संयुक्तिकपणे केली .या सूतगिरणी ची अख्ख्या मराठवाड्यात चर्चा होती .त्यांचा पश्चात ऍड भालेराव यांचे पूर्ण वर्चस्व प्रस्थास्पित झाले .केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे व मान्यवरांचे या सुतगिरणीला सहकार्य लाभले.
मागील दोन वर्षा पूर्वी ऍड गौतम दादा भालेराव यांचे निधन झाल्या नंतर पाहिल्यांदाच सहकारी सूतगिरणीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली यात डॉ सिद्धार्थ भालेराव व समर्थकांची सर्व जागेवर बिनविरोध निवड झाली .त्या बाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. स्व. गौतम दादा भालेराव यांच्या पश्चात त्यांचे बंधू डॉ सिद्धार्थ भालेराव यांनी आपले राजकीय नेतृत्व मतदार संघात सिद्ध केले. या निमित्ताने मतदार संघात सकारात्मक संदेश गेला.
आंबेडकरी चळवळीत धाडसी नेतृत्ब ऍड गौतम दादा यांचे चिरंजीव ऍड बुद्धप्रिय भालेराव तसेच युवा नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार प्रमोद साळवे यांची निवड झाली आहे. लोहा तालुक्यातील आडगाव येथील रिपाई चे धडाडीचे कार्यकर्ते दिलीप धनसडे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. लोहा भागाला पहिल्यांदा संधी मिळाली .दिलीप हे स्व गौतमदादा भालेराव यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.