महाराष्ट्राची राजधानी मुंबईला बरबाद करण्याचे षडयंत्र या भाजपने चालवले - शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले-NNL


किनवट, माधव सूर्यवंशी।
महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे 35 हजार कोटी रुपये माफ केले आणि 20 हजार कोटीचे पांदण रस्ते करून शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते करून दिले तर एकीकडे मोदी सरकार मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन आणून व्यापाऱ्यांचा फायदा करीत आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईला बरबाद करण्याचे षडयंत्र या भाजपने चालवले आहे. आसे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनी शिव संपर्क अभियान अंतर्गत साई मंगल कार्यलय येथे आयोजित बेठकीत केले.

 आज भाजपचे पायलीभर नेते वाटेल त्या प्रकारे भुंकत आहेत. या सर्वांना आमचा एकच शिवसेनेचा वाघ संजय राऊत पुरून उरले आहेत हे शिवसेनेची ताकद आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असे आव्हान माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी प्रसंगी किनवट येथील बैठकीत केले दिनांक दोन जून रोजी शिव संपर्क अभियानांतर्गत किनवट / माहूर विधानसभा क्षेत्राची बैठक साईबाबा मंदिर सभागृहात सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आली.

या बैठकीस जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,नांदेड जिल्हा समन्वयक धोंडू पाटील ,दयाल गिरी जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्ष जनाबाई डुडूळे किनवट माहूर विधानसभा संघटक सचिन नाईक , तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, मा . नगराध्यक्ष सुनील पाटील, शहरप्रमुख सुरज सातुवार , शहरप्रमुख संतोष यलचलवार , युवासेनेचे यश खराटे, गजानन कोल्हे . महिला आघाडीचे लतिका दूसावार, कविता मुंडावार व्यासपिठावर उपस्थित होते.

या बैठकिस दिशा समिती सदस्य मारुती सूनकलवार, मारोती दिवसे ,  रघुनाथ चटेकर ,भावराव राठोड ,बजरंग वाडगुरे, राम पाटील, अतुल दर्शनवार , कपिल रेड्डी  सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .याप्रसंगी सचिन नाईक , सुदर्शन नाईक,धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख दत्त्ता पाटील कोकाटे यांची भाषणे झाली यावेळी किनवट / माहूर विधानसभेची जागा ही  शिवसेनेला सोडन्याची मागणी शिवसैनिकांनी जोर लावून धरली होती मागणीस उपनेते वडले म्हणाले की मी आपला पोस्टमन  आपली मागणी रास्त असून मी पोस्टमनच काम नक्कीच करेल आणि  विधानसभेसाठी शिवसेनेचे जागा सोडण्याचा प्रयत्न करेल आणि हा आपला निरोप पक्षप्रमुखा पर्यंत पोहचविल   असे आश्वासन बैठकीमध्ये उपनेते यांनी दिले .  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन  तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे यांनी केले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी