महात्मा फुले लिखीत “तृतीय रत्न”चा कुसूम सभागृहात 4 जून रोजी प्रयोग -NNL

·  सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश

·  महाज्योती तर्फे आयोजन


नांदेड।
 नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात शनिवार 4 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा जोतिबा फुले लिखीत ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. 


महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावात्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवारसंचालक डॉ. बबनराव तायवाडेप्रा. दिवाकर गमेलक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.


अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. या आधी विविध जिल्ह्यात 26 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी